Coronavirus News: ठाणे आयुक्तालयात ४८ तासांमध्ये ४४ पोलीस झाले कोरोना बाधित
By जितेंद्र कालेकर | Published: July 15, 2020 10:54 PM2020-07-15T22:54:46+5:302020-07-15T22:57:28+5:30
गेल्या ४८ तासांमध्ये ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात आणखी ४४ पोलीस बाधित झाले आहेत. आतापर्यंत ८० अधिकारी आणि ६८७ कर्मचारी असे ७६७ पोलीस बाधित झाले आहेत. ६१ अधिकाऱ्यांसह ५४९ कर्मचारी अशा ६१० पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: गेल्या ४८ तासांमध्ये ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात आणखी ४४ पोलीस बाधित झाले आहेत. यामध्ये कासारवडवलीच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह पाच अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे बाधितांची संख्या ही तब्बल ७६७ च्या घरात गेल्याने पोलिसांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.
गेल्या काही दिवसापासून पोलिसांमध्ये कोरोनाचे प्रमाण बºयापैकी नियंत्रणात आले होते. २ जुलै रोजी एकीकडे ठाणे शहर, कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगरमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आले. त्याचवेळी आयुक्तालयात एकाच वेळी ३९ पोलिसांना बाधा झाल्याचे आढळले. त्यानंतर काही अंशी बाधित होणाºया पोलिसांची संख्या नियंत्रणात आली होती. १३ जुलै रोजी या संख्येत पुन्हा वाढ झाली. सोमवारी एकाच दिवसात तीन अधिकारी आणि २८ कर्मचारी अशा ३१ पोलिसांना लागण झाली. त्यापाठोपाठ १४ जुलै रोजी शांतीनगर पोलीस ठाण्याच्या दोन सहायक पोलीस निरीक्षक आणि ११ कर्मचारी अशा १३ जणांना पुन्हा लागण झाली. यामध्ये वाहतूक शाखेच्या तिघांचा तर उल्हासनगरच्या दोघांचा समावेश आहे.
* आतापर्यंत ८० अधिकारी आणि ६८७ कर्मचारी असे ७६७ पोलीस बाधित झाले आहेत. ६१ अधिकाºयांसह ५४९ कर्मचारी अशा ६१० पोलिसांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंूत पाच पोलिसांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.