Coronavirus News: ठाणे जिल्ह्यात नविन ५२१ कोरोना रु ग्णांची नोंद: ११ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 11:38 PM2020-12-06T23:38:01+5:302020-12-06T23:41:44+5:30
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे चित्र असले तरी शनिवारच्या तुलनेत रविवारी कमी कोरोनाबाधित रुग्ण आढळले. रविवारी ठाणे जिल्ह्यात ५२१ रु ग्णांची तर ११ जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे चित्र असले तरी शनिवारच्या तुलनेत रविवारी कमी रुग्ण आढळले. रविवारी ठाणे जिल्ह्यात ५२१ रुग्णांची तर ११ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यात एकूण रु ग्णसंख्या दोन लाख ३२ हजार ९२२ रुग्णांची तर पाच हजार ७४४ इतकी मृतांची संख्या झाली आहे.
ठाणे जिल्ह्यातील ठाणे महानगर पालिका क्षेत्रात १२९ बाधितांची तर तिघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या ५२ हजार ५८९ तर, एक हजार २५२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. नवी मुंबईमध्ये ११६ रु ग्णांची तर तिघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे याठिकाणी ४९ हजार १२ रुग्णांची तर ९९८ मृतांची आतापर्यंत नोंद झाली. कल्याण डोंबिवलीत नव्याने १२१ रु ग्णांसह दोघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे ५४ हजार ८७४ बाधितांची तर एक हजार ६९ मृतांची नोंद झाली आहे. मीरा भार्इंदरमध्ये ४९ रु ग्णांची तर एकाच्या मृत्युची नोंद झाली. भिवंडी महापालिका क्षेत्रात तीन रुग्ण नव्याने बाधित झाले. तसेच उल्हासनगरमध्ये ३३ रुग्णांची तर एकाच्या मृत्युची नोंद झाली. अंबरनाथमध्येही १० रुग्णांची तर एकाच्या मृत्युची नोंद झाली. बदलापूरमध्ये ४० रु ग्णांची नोंद झाली. तसेच, ठाणे ग्रामीण भागात २० रु ग्णांची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या १८ हजार ३०८ झाली आहे.