VIDEO: कहाँ से आते है ये लोग? बंद शटर उघडताच लागली रांग; पोलिसांनी मारला डोक्यावर हात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 08:35 PM2021-05-11T20:35:43+5:302021-05-11T20:36:02+5:30
- सदानंद नाईक उल्हासनगर : शहरातील प्रसिद्ध गजानन मार्केटमधील एका शटर बंद दुकानात ८० पेक्षा जास्त नागरिक कपड्याची खरेदी ...
- सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरातील प्रसिद्ध गजानन मार्केटमधील एका शटर बंद दुकानात ८० पेक्षा जास्त नागरिक कपड्याची खरेदी करत असल्याचा प्रकार उघड झाला. महापालिका व पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करून दोन दुकाने सील केली. तसेच दंडात्मक कारवाई केल्याची माहिती महापालिकेचे सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली.
उल्हासनगरात नावालाच संचारबंदी असून शटर बंद करून दुकानात सर्रासपणे विक्री सुरू आहे. कॅम्प नं-२ मधील प्रसिद्ध जपानी व गजानन कपडे मार्केटसह शहरातील बहुतांश दुकानदार बाहेरून दुकानाचे शटरबंद करून दुकानात कोरोना नियमाचे उल्लंघन करून विक्री सुरू आहे. याबाबतची कल्पना पोलिसांसह महापालिका अधिकाऱ्यांना असूनही कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. नगरसेवक राजेश टेकचंदानी यांच्या सतर्कतेमुळे पोलीस व महापालिका अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे दोन दुकानावर मंगळवारी सकाळी कारवाई केली. शगुन नावाच्या दुकानात तब्बल ८० पेक्षा जास्त नागरिक कपड्याची खरेदी करीत असल्याचे उघड झाले.
उल्हासनगरात कठोर निर्बंध लागू असताना दुकानाचं शटर लावून कपड्यांची विक्री सुरू; एकाच दुकानात तब्बल ८० जण; पोलिसांकडून दुकान सील https://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/Kt3VKefxTI
— Lokmat (@MiLOKMAT) May 11, 2021
महापालिकेने गेल्या काही महिन्यात दुकानाचे बाहेरून शटरबंद करून आत मध्ये कपड्याची विक्री करणाऱ्या दुकानासह मास्क विना फिरणाऱ्या नागरिकवर कारवाई करून ३० लाखा पेक्षा जास्त दंड वसूल केल्याची माहिती महापालिकेचे सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली. तसेच कारवाई सुरूच असल्याचे सांगितले. महापालिकेची कारवाई सुरू असलेतरी, शहरात शटरबंद दुकानात आतून सर्रासपणे विक्री सुरू असून कोरोना संसर्ग होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पोलिसांनी व महापालिकेने कोरोना काळात तरी अश्या दुकानावर सक्त कारवाई करण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे. तसेच महापालिका व पोलीस करवाईवर संशय व्यक्त होत आहे..