CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात ९२४ कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 04:52 AM2020-06-24T04:52:06+5:302020-06-24T04:52:27+5:30
ठाणे : ठाणे जिल्ह्यात मंगळवारी ९२४ बाधितांची तर ४१ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ...
ठाणे : ठाणे जिल्ह्यात मंगळवारी ९२४ बाधितांची तर ४१ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या २३ हजार ४९२ तर मृतांची ८१२ झाली आहे. या वाढत्या बाधितांच्या संख्येसह वाढत्या मृतांच्या संख्येमुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.
मंगळवारी कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात सर्वाधिक २०२ रुग्णांसह चार जणांच्या मृत्यूची नोंद झाल्यामुळे तेथील बाधितांची संख्या ३ हजार ९७० तर मृतांची ८१ इतकी झाली आहे. त्यापाठोपाठ भिवंडी महापालिका क्षेत्रात १२२ बाधितांसह नऊ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. यामुळे तेथील बाधितांची संख्या एक हजार २३९ तर मृतांची ८३ वर पोहोचली. ठाणे महानगरपालिका हद्दीत १८७ बाधितांची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या ६ हजार ६३० वर गेली असून तर १० जणांच्या मृत्यूने एकूण मृतांची संख्या २४२ झाली आहे. नवी मुंबई महापालिकेत १११ रु ग्णांची तर ४ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे बाधितांची संख्या ५ हजार ७२ झाली आहे.
मीरा-भार्इंदरमध्ये ९४ रुग्णांसह चार जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या २ हजार ४८१ तर मृतांची ११६ इतकी झाली आहे. उल्हासनगरात ८३ रु ग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या एक हजार २०८ तर मृतांची ८३ झाली आहे. अंबरनाथमध्ये ५३ रु ग्णांसह तीन जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या एक हजार ३२२ तर मृतांची ३४ झाली आहे.
बदलापूरमध्ये २४ नव्या रु ग्णांची नोंद केल्याने बाधितांची संख्या ५९३ तर मृतांची १३ झाली आहे. तर ठाणे ग्रामीण भागात ४८ रुग्णांसह दोन मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या ९७७ तर मृतांची ३०वर गेली आहे.
वसई-विरारमध्ये
१३९ नवीन रुग्ण
वसई-विरार शहरात मंगळवारी १३९ नवीन रुग्ण आढळून आले. चौघांचा मृत्यू झाला, तर ९२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे पालिका हद्दीतील कोरोनाबाधितांची संख्या २३४८वर पोहोचली आहे. एकूण मृत्यू झालेल्यांची संख्या ९३ झाली आहे. तर कोरोनामुक्त संख्या १,३७० झाली आहे, तर एकूण ८८५ रुग्ण उपचार घेत आहेत.