CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत कमालीची घट; ९८३ नवे रुग्ण, ३० जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 09:14 PM2020-10-19T21:14:12+5:302020-10-19T21:14:37+5:30
CoronaVirus News : ठाणे शहरात दिवसभरात २४३ रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. आता या शहरात ४३ हजार ८१४ रुग्ण संख्या झाली आहे.
ठाणे : कोरोनाचे अवघे ९८३ रुग्ण सोमवारी दिवसभरात आढळले. या कमी रुग्ण संख्येमुळे जिल्ह्यात समाधान व्यक्त केले जात आहे. आता जिल्ह्यातील रुग्ण संख्या दोन लाख एक हजार ४५६ झाली आहे. आज ३० जणांचा मृत्यू झाल्यामुळे आता जिल्ह्यातील मृतांची संख्या पाच हजार १०० झाली आहे, अशी माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिली आहे.
ठाणे शहरात दिवसभरात २४३ रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. आता या शहरात ४३ हजार ८१४ रुग्ण संख्या झाली आहे. आज सहा जणांचा मृत्यू झाल्यामुळे या शहरात आतापर्यंत एक हजार ११० मृतांची नोंद करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवलीला आज कोरोनामुळे आठ जणांचा मृत्यू झाल्यामुळे येथे एकूण ९६३ मृतांची संख्या झाली आहे. नव्याने २१९ रुग्ण आढळून आले असून रुग्णांची संख्या आता ४८ हजार १०७ वर गेली आहे.
उल्हासनगरात आज ३३ नवे रुग्ण सापडल्यामुळे रुग्णांची संख्या नऊ हजार ८९१ झाली आहे. तर एकाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ३२५ झाली आहे. भिवंडीला पाच रुग्ण नव्याने आढळले असून एकही मृत्यू आज झाला नाही. या शहरात एकूण बाधीत सहा हजार ६७४ रुग्णांची, तर, ३२८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मीरा भाईंदरला १०६ रुग्ण सापडले असून सहा मृत्यू झाले आहे. तर, बाधितांची संख्या आता २१ हजार ३९७ झाली असून मृतांची संख्या ६७७ पर्यंत गेली आहे.
अंबरनाथमध्ये २५ रुग्ण आज आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे. आता बाधित सात हजार १९ रुग्ण असून २५९ मृत्यू आजपर्यंत झाले आहे. बदलापूरमध्ये ३२ रुग्ण नव्याने सापडले असून बाधीत रुग्ण सहा हजार ९८८ झाले आहेत. या शहरात आजही मृत्यू झालेला नाही. त्यामुळे मृत्यूची संख्या ९३ कायम आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात ११५ रुग्ण नव्याने वाढले आहे. तर, तिघांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत बाधीत रुग्ण १६ हजार १४९ झाले आहेत. तर मृत्यूची संख्या ४९० नोंदवण्यात आली आहे.