CoronaVirus News : कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या नॉन कोविड हॉस्पिटलवर होणार कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 04:08 PM2020-10-20T16:08:37+5:302020-10-20T16:10:13+5:30

CoronaVirus News: इतर नगरसेवकांनी देखील अशा नॉन कोविड हॉस्पिटलवर काय कारवाई करणार? असा सवाल उपस्थित करीत प्रशासनाला धारेवर धरले.

CoronaVirus News: Action will be taken against non-covid hospitals treating corona patients | CoronaVirus News : कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या नॉन कोविड हॉस्पिटलवर होणार कारवाई

CoronaVirus News : कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या नॉन कोविड हॉस्पिटलवर होणार कारवाई

Next
ठळक मुद्देमहापौर नरेश म्हस्के यांनी देखील अशा प्रकारे नॉन कोविड हॉस्पिटल कोरोना रुग्णांवर उपचार होत असतील तर त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढू शकते. त्यामुळे अशा रुग्णालयांवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले.

ठाणे : कोरोनाच्या रुग्णांची वाढती रुग्णांची संख्या लक्षात घेता आजही नॉन कोविड हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार केले जात असल्याची धक्कादायक बाब मंगळवारी झालेल्या महासभेत नगरसेवकांनी पुन्हा उघडकीस आणली आहे. विशेष म्हणजे अशा रुग्णांवर उपचार करतांना त्यांची कोविड टेस्ट केली जात नसून केवळ रक्ताची चाचणी किंवा एक्सरे रिपोर्ट घेऊन अशा रुग्णांवर उपचार केले जात असल्याची धक्कादायक बाबही यावेळी नगरसेवकांनी उघडकीस आणली आहे. त्यानुसार, पुढील १० ते १५ दिवसात दोन समित्या नेमून सर्व हॉस्पिटलची पाहणी करुन अशा पद्धतीने उपचार केले जात असतील,  त्या हॉस्पिटलवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिले.

मंगळवारी महासभा सुरु होताच, शिवसेनेच्या नगरसेविका मिनल संख्ये यांनी या मुद्याला हात घातला. शहरातील नॉन कोविड हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार केले जात असल्याची धक्कादायक बाब त्यांनी उघडकीस आणली. विशेष म्हणजे, पालिकेने यापूर्वी कारवाई करुनही शहरातील खाजगी हॉस्पिटल अशा पद्धतीने धाडस कसे करतात? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

शहरातील अशी काही खाजगी हॉस्पिटल रुग्णांची कोरोना चाचणी करीत नाहीत, परंतु त्यांची रक्ताची चाचणी करतात, किंवा एक्सरे रिपोर्ट काढून, रुग्णाला कोरोना झाला आहे किंवा नाही याची माहिती देतात, त्यानंतर अशा रुग्णांना आम्ही तुमच्यावर येथेच उपचार करतो, असे सांगून त्यांच्याकडून पैशांचीही लूट करीत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला.

दुसरीकडे हाच मुद्दा धरुन इतर नगरसेवकांनी देखील अशा नॉन कोविड हॉस्पिटलवर काय कारवाई करणार? असा सवाल उपस्थित करीत प्रशासनाला धारेवर धरले. तर असे नॉन कोविड हॉस्पिटल कोरोना रुग्णांवर उपचार करीत असल्याने त्यामुळे इतर रुग्णांना देखील कोरोनाची लागण होऊ शकते, त्यामुळे कोरोनाला अटकाव कसा घालणार, असा सवाल नगरसेविका अर्पणा साळवी यांनी उपस्थित केला.

दरम्यान, महापौर नरेश म्हस्के यांनी देखील अशा प्रकारे नॉन कोविड हॉस्पिटल कोरोना रुग्णांवर उपचार होत असतील तर त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढू शकते. त्यामुळे अशा रुग्णालयांवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. त्यानुसार आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. राजू मुरुडकर यांनी या संदर्भात आणखी दोन समित्या नेमल्या जाणार असून त्यानुसार पुढील १० दिवसात शहरातील सर्व हॉस्पिटलची पाहणी करुन अशा पद्धतीने कोरोना रुग्णांवर नॉन कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार होत असतील तर त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल. तसेच, जास्तीची बिले आकारली गेली असतील तर त्यांच्यावर देखील दंडात्मक कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

Web Title: CoronaVirus News: Action will be taken against non-covid hospitals treating corona patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.