CoronaVirus News: ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या १२६० रुग्णांची भर; ३२ जणांचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 07:54 PM2020-10-16T19:54:26+5:302020-10-16T19:54:35+5:30

 ठाणे शहरात ३५२ रुग्ण आज सापडले आहेत. या शहरात आतापर्यंत ४२ हजार ९७८ रुग्णांची नोंद केली आहे.

CoronaVirus News: Addition of 1260 corona patients in Thane district; 32 killed | CoronaVirus News: ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या १२६० रुग्णांची भर; ३२ जणांचा मृत्यू 

CoronaVirus News: ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या १२६० रुग्णांची भर; ३२ जणांचा मृत्यू 

Next

ठाणे : जिल्ह्यात शुक्रवारी एक हजार २६० रुग्ण नव्याने आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात एक लाख ९८ हजार २६० रुग्ण बाधीत झाल्याची नोंद झाली आहे. तर,३२ जणांच्या मृत्यूमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या पाच हजार १५ झाली आहे, अशी माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिली आहे. 

 ठाणे शहरात ३५२ रुग्ण आज सापडले आहेत. या शहरात आतापर्यंत ४२ हजार ९७८ रुग्णांची नोंद केली आहे. तर, सहा मृत्यू झाल्याने आता मृतांची संख्या एक हजार ९२ नोंदवण्यात आली आहे. कल्याण- डोंबिवली शहरात २०८ रुग्ण आढळले असून नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. या शहरात आतापर्यंत मृतांची संख्या ९३८ झाली आहे. तर, बाधीत रुग्ण संख्या ४७ हजार ३५७ झाली आहे. .

 उल्हासनगर शहरात ३० नव्या रुग्णांचा शोध घेण्यात आला आहे. या शहरात आता नऊ हजार ७९४ बाधीत रुग्ण झाले आहेत. तर आज एकाचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या ३२२ वर पोहचली आहे. भिवंडी शहर परिसरात ३७ बाधीत आढळून आले असून एका जणाचा मृत्यू झाला आहे. येथे आता पाच हजार ६११ बाधीत असून आतापर्यंत ३२७ मृत्यू झाले आहे. मीरा भाईंदरमध्ये १३९ रुग्णांची तर आज पाच मृत्यूची नोंद झाली आहे. या शहरात २१ हजार १०६ बाधितांसह ६६२ मृत्यू झाले आहेत.

अंबरनाथमध्ये ४३ बाधीत सापडले असून आज दोघां मृताची नोंद झाली आहे..आता बाधितांची संख्या सहा हजार ९३६ असून २५५ मृत्यू झाले आहेत. बदलापूरमध्ये ३० रुग्णांचा नव्याने शोध लागल्यामुळे आता बाधीत सहा हजार ८६६ झाले आहेत. या शहरात आज एकही मृत्यू झाला नसल्यामुळे मृत्यूची संख्या ९३ कायम आहे. जिल्ह्यातील गांवपाड्यांमध्ये ७४ रुग्ण आज सापडले असून तीन मृत्यू झाले आहेत. या क्षेत्रात १५ हजार ८८२ बाधीत झाले असून मृतांची संख्या ४८५ वर गेली आहे.

Web Title: CoronaVirus News: Addition of 1260 corona patients in Thane district; 32 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.