Coronavirus News: ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे आणखी एक हजार ७०० रुग्ण दाखल: ३५ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 01:29 AM2020-07-14T01:29:02+5:302020-07-14T01:31:59+5:30

ठाणे जिल्हयात कोरोनाबाधितांच्या संख्येत आणखी वाढ झाली असली तरी रविवारच्या तुलनेत सोमवारी ती काही अंशी कमी झाली. रविवारी जिल्हयात दोन हजार १५० नवीन कोरोना बाधितांची वाढ झाली होती. तर ५४ जणांचा मृत्यू झाला होता. याऊलट, सोमवारी मात्र, २४ तासांमध्ये जिल्ह्यात एक हजार ७०० रुग्ण दाखल झाले. तर ३५ जणांचा मृत्यू झाला. रुग्ण नव्याने दाखल होण्याचे प्रमाण आणि मृत्यू दरही काही अंशी घटल्याचे या आकडेवारीवरुन पहायला मिळाले.

Coronavirus News: Another 1,700 corona patients admitted in Thane district: 35 die | Coronavirus News: ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे आणखी एक हजार ७०० रुग्ण दाखल: ३५ जणांचा मृत्यू

बाधितांची संख्या ५७ हजार चार तर मृतांची संख्या एक हजार ६५१ झाली

Next
ठळक मुद्देजिल्हयात कोरोनाबाधितांच्या संख्येत आणखी वाढबाधितांची संख्या ५७ हजार चार तर मृतांची संख्या एक हजार ६५१ झाली

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: जिल्ह्यातील बाधित रु ग्णांच्या संख्येत रविवारपेक्षा सोमवारी काहीअंशी कमी नोंद झाल्याचे आढळले आहे. सोमवारी जिल्ह्यात एक हजार ७०० रुग्ण दाखल झाले. तर कोरोनामुळे ३५ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ५७ हजार चार तर मृतांची संख्या एक हजार ६५१ इतकी झाली आहे.
कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात १३ जुलै रोजी देखिल सर्वाधिक ४२७ रु ग्णांसह नऊ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे याठिकाणी १३ हजार २४० इतकी बाधितांची तर, १९८ मृतांची संख्या झाली आहे. त्यापाठोपाठ ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये ३३३ बाधितांची तर सात जणांच्या मृत्यूची नोंद झाल्यामुळे याठिकाणी बाधितांची संख्या १३ हजार ६७५ तर, मृतांची संख्या ५१५ वर पोहचली आहे. नवी मुंबई महापालिकेत २३३ नवे रुग्ण दाखल झाले. तर दोघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या नऊ हजार ६७८ तर मृतांची संख्या ३०५ वर पोहचली आहे. मीरा भार्इंदरमध्ये सोमवारी १७८ नव्या रुग्णांची तर आठ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या पाच हजार ७४६ तर मृतांची संख्या १९९ वर पोहचली आहे. भिवंडी महापालिका क्षेत्रात ४२ बाधितांची तर एकाच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे भिवंडीत बाधितांची संख्या दोन हजार ८२४ तर, मृतांची संख्या १४७ वर पोहोचली. उल्हासनगर महापालिका क्षेत्रातही २२५ रु ग्ण नव्याने दाखल झाले असून चौघांचा मृत्यू झाला. त्यामुळे बाधितांची संख्या चार हजार ४२५ तर, मृतांची संख्या ७१ वर पोहचली आहे. अंबरनाथमध्ये ५१ रु ग्णांची नोंद झाल्यामुळे याठिकाणी बाधितांची संख्या दोन हजार ७२५ झाली. तर बदलापूरमध्ये ८४ रु ग्ण नव्याने दाखल झाले. त्यामुळे बाधितांची संख्या एक हजार ४७७ झाली. तसेच ठाणे ग्रामीण भागात १२७
रु ग्णांची तर चौघांच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या तीन हजार २१४ तर मृतांची संख्या ८१ वर गेल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Coronavirus News: Another 1,700 corona patients admitted in Thane district: 35 die

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.