CoronaVirus News: भाजपा आमदार महेश चौघुले यांना कोरोनाची लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 04:48 AM2020-06-27T04:48:01+5:302020-06-27T04:48:55+5:30
परप्रांतीय कामगारांना श्रमिक ट्रेनमधून जाण्यासाठी ते सातत्याने मदत करत होते. त्याचबरोबर कोरोना संदर्भातील उपाययोजना करण्यासाठी विविध सभांमध्येही ते सहभागी झाले होते.
भिवंडी : भिवंडी पश्चिमेतील भाजप आमदार महेश चौघुले यांना कोरोनाची लागण झाली आहे. चौघुले यांचे खाजगी सुरक्षारक्षक, चालक व सहकारी यांना लागण झाल्याने त्यांनी कोरोनाची तपासणी केली होती. गुरुवारी रात्री त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचारासाठी त्यांना मुलुंड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. चौघुले लॉकडाऊनच्या काळात शहरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी काम करीत होते. गरिबांसाठी अन्नधान्याचे वाटप करत होते. परप्रांतीय कामगारांना श्रमिक ट्रेनमधून जाण्यासाठी ते सातत्याने मदत करत होते. त्याचबरोबर कोरोना संदर्भातील उपाययोजना करण्यासाठी विविध सभांमध्येही ते सहभागी झाले होते.