Coronavirus News: ठाण्यात लॉकडाऊन वाढविल्यास भाजपाकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 12:35 AM2020-07-18T00:35:22+5:302020-07-18T00:41:53+5:30

लॉकडाऊनबाबत नागरिकांमध्ये आक्र ोश आहे. त्यामुळे यापुढे लॉकडाऊन वाढविल्यास भाजपाकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराच आता ठाणे भाजपाने महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांना दिलेल्या निवेदनामध्ये केला आहे.

Coronavirus News: BJP warns of intensified agitation if lockdown in Thane is increased | Coronavirus News: ठाण्यात लॉकडाऊन वाढविल्यास भाजपाकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

लॉकडाऊन ठाणे भाजपने केला विरोध

Next
ठळक मुद्देलॉकडाऊन ठाणे भाजपने केला विरोध आमदार निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली पालिका आयुक्तांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाणे महापालिकेच्या क्षेत्रामध्ये सध्या लागू असलेल्या लॉकडाऊनच्या मुदतवाढीला यापुढे भाजपाने तीव्र विरोध दर्शविला आहे. लॉकडाऊनबाबत नागरिकांमध्ये आक्र ोश आहे. त्यामुळे यापुढे लॉकडाऊन वाढविल्यास भाजपाकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराच आता ठाणे भाजपाने महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांना दिलेल्या निवेदनामध्ये केला आहे. यासंदर्भात आयुक्तांनी सकारात्मक भूमीका व्यक्त केल्याचे आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितले.
भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष, आमदार डावखरे यांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या शिष्टमंडळाने आयुक्तांना शुक्रवारी यासंदर्भातील निवेदन दिले. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेऊन ठाणे महापालिकेच्या क्षेत्रामध्ये २ ते १२ जुलैपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले. त्यानंतर त्यालाही १९ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मात्र, लॉकडाऊनच्या काळातही कोविड रु ग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याकडे आयुक्त डॉ. शर्मा यांचे भाजपाने लक्ष वेधले आहे.
मुंबईमधील काही भागात सम-विषम नियमानुसार दुकाने आणि मर्यादित कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने कार्यालय सुरु झाली आहेत. त्यामुळे मुंबईत ठाणेकरांची ये-जा सुरू आहे. मात्र, ठाणेकरांच्या उपजिविकेसाठी आवश्यक असलेले व्यवहारही ठप्प झाले आहेत. त्यामुळे याबाबत जनतेमध्ये तीव्र आक्रोश पसरला आहे. लॉकडाऊन हे एक माध्यम आहे. मात्र, त्यामुळे कोरोनाला आळा बसलेला नाही. यापुढे लॉकडाऊन वाढविल्याची भूमिका घेतल्यास भाजपाकडून आंदोलन करण्यात येईल, असा इशाराच भाजपने दिला आहे. त्याचबरोबर कोविड संसर्ग रोखण्याच्या भविष्यातील उपाययोजनांबाबत भूमिका स्पष्ट करण्याची विनंतीही केली. या शिष्टमंडळात आमदार संजय केळकर, महापालिकेतील गटनेते संजय वाघुले आणि नगरसेवक भरत चव्हाण आदींचा समावेश होता.

‘‘ठाणे शहर आणि जिल्हयाला कोरोनामुक्त करण्यासाठी महापालिका तसेच जिल्हा प्रशासनाच्या स्तरावर वारंवार लॉकडाऊन आणि मिशन बिगिन अगेन सारखे प्रयत्न करुनही कोरोना विषाणूचा प्रसार वाढला आहे. याचा सर्वाधिक फटका उद्योगांना बसला. त्यामुळे अनेक उद्योजक देशोधडीला लागत आहेत. अजुनही शासनाने अत्यावश्यक सेवेतील नसलेले उद्योग तसेच दुकाने बंद ठेवल्याने त्यांच्या जागेचे भाडे तसेच विविध कर, मोठी वीज बिले, पगार, स्थानिक कर अशा एक ना अनेक गोष्टींचा बोजा वाढत आहे त्यामुळे व्यापार व उद्योगांवर मोठे संकट आले आहे. त्यामुळेच येत्या २० जुलैपासून पुन्हा लॉकडाऊन न करता उद्योग चालू करण्याला परवानगी दिली जावी. सतत लॉकडाऊन करण्या पेक्षा कोरोना विषाणू वर पूर्णपणे नियंत्रण ठेवण्यासाठी सुयोग्य नियोजन करावे अत्यंत कडक निर्बंध लादावेत. जे लोक कोरोनाविषयी अटी शर्तीचे काटेकोरपणे पालन करत नाही अशा लोकांना नुसता आर्थिक दंड न ठोठावता कठोर शिक्षा करावी अशी आमची विनंती आहे . यासंदर्भातील पत्रच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांनाही दिले आहे.’’
आप्पासाहेब खांबेटे, अध्यक्ष, लघुउद्योजक संघटना, ठाणे
लॉकडाऊन हा पर्याय नाही- डॉ. महेश बेडेकर
 

‘‘नागरिक आणि प्रशासन दोन्ही घटक महत्वाचे आहेत. समन्वयाच्या ऐवजी या दोन्हीमध्ये तूट दिसते. साथरोग प्रतिबंधच्या नावाखाली लॉकडाऊन केले जात आहे. पण त्याचा फारसा उपयोग झालेला नाही. ही दोन्ही चाके एकत्र चालणे आवश्यक आहे. स्थानिक नेत्यांसह प्रशासन आणि नागरिक यांचीही जबाबदारी आहे. सोशल डिस्टसिंग ठेवणे याला काही शास्त्रीय आधारही आहे. पण तपासण्याही वाढविल्या पाहिजेत. कारंटाईन सेंटरचीही सुधारणा अपेक्षित आहे. जिथे २०० ची क्षमता आहे तिथे एक हजार लोकांना कॉरंटाईन केले जाते. लॉकडाऊन हा तात्पूरता पर्याय असला तरी त्यापेक्षा वेगळा काहीतरी पर्याय सर्वच यंत्रणांनी एकत्र येऊन शोधणे ही काळाची गरज आहे. ’’
डॉ. महेश बेडेकर, सामाजिक कार्येकर्ते, ठाणे
.........................

‘‘लॉकडाऊन वाढवून फारसे काही साध्य झाले असे वाटत नाही. अत्यावश्यकच्या नावाखाली उलट अनेक ठिकाणी गर्दी होते. दूध, किराणा, भाजीपाला सुरळीत ठेवणे अपेक्षित आहे. जेंव्हा बंद केले जाते, तेंव्हा ते मिळविण्यासाठी आणखी गर्दी होते. मग सोशल डिस्टसिंगचे नियम पाळले जात नाहीत.’’
संभाजी चव्हाण, अध्यक्ष, पंचवटी सोसायटी, वसंतविहार, ठाणे.
...................

लॉकडाऊन पुन्हा वाढविणे योग्य नाही. अनेक कामधंदे बंद आहे. अनेक कामगारांना त्यांचे वेतनही मिळालेले नाही. त्यामुळे लाईट बिल, गॅस सोसायटी मेंटनस असा सर्वच खर्च कसा भागवायचा असे प्रश्न सर्वसामान्यांना भेडसावत आहेत. लॉकडाऊन केल्यानंतर सर्व सुविधा देणार असाल, सर्व नागरिकांना रेशन आणि लाईट बिल, गॅस बिल मोफत केले तर काहीच समस्या उद्भवणार नाही. पण पैसेही नाहीत आणि घरात अन्नही नाही तर सामान्य माणसाने जगायचे कसे? हा मोठा यक्ष प्रश्न आहे.
संतोष निकम मनसे शाखाध्यक्ष वर्तकनगर भीमनगर
 

Web Title: Coronavirus News: BJP warns of intensified agitation if lockdown in Thane is increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.