CoronaVirus News: धोका वाढला! म्युकरमायकोसिस मुंबईच्या वेशीवर पोहोचला; ठाण्यात पहिल्या रुग्णाची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 09:24 PM2021-05-10T21:24:46+5:302021-05-10T21:26:54+5:30
CoronaVirus News: जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू; ५६ वर्षांच्या महिलेला लागण
ठाणे: मागील काही दिवसापासून म्युकरमायकोसिस या आजाराची चर्चा सुरू असतानाच ठाणे जिल्ह्यात या आजाराचा पहिला रुग्ण आढळला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे त्याचा थेट परिणाम डोळ्यांवरदेखील होत असून यामध्ये रुग्णांचे डोळे निकामी होत असल्याच्या घटना समोर येत आहे. अशीच एक घटना ठाणे जिल्ह्यात समोर आली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत असलेल्या एका ५६ वर्षीय महिलेच्या उजव्या डोळ्याची हालचाल होत नसल्याचे समोर आल्यानंतर त्याची गांभीर्याने दाखल घेत, त्यांच्या काही चाचण्या केल्या असत्या, त्या चाचणी अहवालातून त्यांना म्यूकरमायकोसिस या आजाराची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्राला मोठा दिलासा, दैनंदिन रुग्णवाढ ४० हजारांच्या खाली, बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले
ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात म्यूकरमायकोसिस या आजाराचा पहिली महिला रुग्ण आढळून आली आहे. रविवारी रात्री एका ५६ वर्षीय महिलेला कोरोना या आजारामुळे जिल्हा सामान्य रु ग्णालयात दाखल केले. त्यावेळी त्यांचा उजवा डोळा लाल झाल्याचे दिसून आले. त्यावेळी तेथील कर्तव्यावरील डॉक्टरांनी नेत्र विभागाशी संपर्क साधून रुग्णाची तपासणी करण्याचा सल्ला दिला. त्यावेळी जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉ. शुभांगी अंबाडेकर यांनी त्या महिला रुग्णांची तपासणी केली. त्यावेळी त्या महिलेचे डोळे वर आल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. तसेच त्यांच्या उजव्या डोळ्याची हालचाल होत नव्हती, तसेच लाईट दाखवल्यानंतरही त्यांच्या डोळ्यातील बाहुलीची कोणतीच हालचाल होत नव्हती. त्यानंतर त्यांचे सिटीस्कॅन, ऑर्बिट ब्रेन सिटी स्कॅन करण्यात आले. त्यावेळी त्यांच्या उजव्या डोळ्याच्या मास पेशींना सूज असल्याचे दिसून आले. तर, सायनसमध्येदेखील सूज असल्याचे त्या अहवालातून समोर आले आहे. त्यामुळे या सर्व बाबींवरून त्या महिलेला म्यूकरमायकोसिस हा आजार झाल्याचे समोर आहे. त्यामुळे त्या जिल्ह्यातील पहिली महिला रुग्ण आढळून आली असल्याचे समोर आले आहे.
शाब्बास मुंबईकर! कोरोना लढ्यात मोठं यश; २४ तासांत दोन हजारांहून कमी रुग्णांची नोंद
ठाणे जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यात कोरोना या आजाराचे स्ट्रेनदेखील बदलत आहे. त्यात नुकतेच काही जिल्ह्यांमध्ये कोरोना या आजारात रोग प्रतिकारशक्ती खालावलेल्या रुग्णांमध्ये म्यूकरमायकोसिस नावाचा आजार आढळून येत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन त्याचा थेट परिणाम डोळ्यांवर होत आहे. यात रुग्णांचे डोळे निकामी होत असल्याचे काही प्रकार समोर आले आहेत. हे प्रमाण वाढण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तसेच म्यूकरमायकोसिस नावाचा बुरशीपासून होणारा दुर्मीळ, पण अत्यंत घातक संसर्ग आहे. त्यातून डोळा गमावल्याची प्रकरणो मात्र नवी आहेत. दुसऱ्या लाटेत ही चिंताजनक बाब पुढे आली आहे. हा आजार होण्याचे मुख्य कारण म्हणजे कोरोनाकाळात कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती. या आजाराचे सायनसमधून संक्रमण सुरू होते. पुढे ते तोंडाच्या आतून वरचा जबडा, डोळा आणि मेंदूपर्यंत पोहोचते. डोळा कायमचा निकामी होतो. पॅरालिसिस आणि मृत्यूही यात ओढावण्याची शक्यता असते.
हा आजार शरीरात कुठेही होऊ शकतो
म्यूकरमायकोसिस हा काळ्या बुरशी सारखा असतो. तो केवळ डोळ्यांमध्ये नाही तर, मेंदू, हिरड्यांमध्ये तसेच छातीत देखील होऊ शकतो, अशी माहिती वैद्यकीय सूत्नांनी दिली.
काय आहेत लक्षणे?
वरच्या पापणीला सूज, ती खाली येणो, डोळा पुढे आल्यासारखा वाटणे, डोळ्यांभोवतीची त्वचा काळसर होणे, डोळ्यांची हालचाल मंदावणे, दोन वस्तू दिसणे , नाकावर सूज, नाक बुजणे, चेहऱ्यावर एका बाजूने सूज, डोळ्यांमध्ये वेदना ही या आजाराची लक्षणो आहेत.
यांना अधिक धोका
रोगप्रतिकारशक्ती मुळात कमी असणाऱ्या, मधुमेह असलेल्यांना धोका अधिक आहे. कोरोना वाढल्यास अॅन्टिव्हायरल आणि स्टेरॉइड द्यावेच लागतात. या औषधांनी रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. कोरोनानंतर त्यामुळे हे संक्रमण होते.
त्या महिला रुग्णाला म्यूकरमायकोसिस या आजाराची लागण झाल्याचे समोर आले आहे. मात्र, हा आजार स्टेरोईडच्या किंवा अँटिबायोटिकच्या अतिसेवनामुळे झाला असल्याची शक्यता आहे. या आजाराची गांभीर्याने दाखल घेत, त्या रुग्णाला पुढील उपचारासाठी मुंबईतील सायन रुग्णालयात हलवण्यात येणार आहे.
(डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे )