CoronaVirus News: ठाण्यातील कळवा रुग्णालयास कोरोनाचा जीवघेणा विळखा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 12:13 AM2020-06-27T00:13:00+5:302020-06-27T00:13:19+5:30
१0 वैद्यकीय अधिकारी, १0 टेक्निशिअन, १५ पुरुष कर्मचारी, १५ सफाई कर्मचारी आणि इतर सात कर्मचाऱ्यांना बाधा झाली आहे. आरोग्यदूतच रुग्ण झाल्याने, सामान्य रुग्णांवर उपचार कोण करणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे जवळपास सर्वच कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. या रुग्णालयातील ५१ महिला कर्मचाऱ्यांना लागण झाली असून, त्यापैकी आठ कर्मचारी बºया होऊन पुन्हा रुजू झाल्या आहेत. याशिवाय १0 वैद्यकीय अधिकारी, १0 टेक्निशिअन, १५ पुरुष कर्मचारी, १५ सफाई कर्मचारी आणि इतर सात कर्मचाऱ्यांना बाधा झाली आहे. आरोग्यदूतच रुग्ण झाल्याने, सामान्य रुग्णांवर उपचार कोण करणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
कळवा रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आला आहे. येथील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, सफाई कर्मचारी, टेक्निशिअन आदींसह अन्य कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. ७0 ते ८0 टक्के कर्मचाºयांना बाधा झाली आहे. त्यामुळे उर्वरित कर्मचाºयांवर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे. यातूनच हे कर्मचारी रुग्णांवर राग काढत आहेत. त्यामुळे रुग्णांची मानसिक स्थिती ढासळू लागली आहे. या परिस्थितीमुळे व्यथित झालेल्या एका रुग्णाने महापौर आणि आयुक्तांना मेसेज करून याची गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे.
कळवा रुग्णालय कोविड रुग्णालय नाही. आयसोलेशन वॉर्डमुळे येथे कोरोनाचा विळखा घट्ट झाला आहे. त्यामुळे इतर आजारांच्या रुग्णांना उपचार मिळणे कठीण झाले आहे. शस्त्रक्रियेची व्यवस्थादेखील बंद करण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाºयांसह रुग्णांचेही हाल सुरु असल्याची व्यथा या रुग्णाने मांडली आहे. येथील १0८ कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात अडकले असून, त्यातील केवळ आठ महिला कर्मचारी कोरोनामुक्त होऊन पुन्हा सेवेत रुजू झाल्या आहेत.
दरम्यान, कळवा रुग्णालयात कंत्राटावर ६0 पुरुष कर्मचाºयांची भरती करण्यात आली आहे. महिला कर्मचाºयांची संख्या १४४ एवढी आहे. प्रत्यक्षात ८९ कर्मचारी कामावर आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा ताण पडला आहे. प्रत्येक महिला कर्मचाºयाला दोन ते तीन पाळ्या कराव्या लागत आहेत. असे असतानाच येथे कोरोनाबाधित रुग्णांसाठी १00 खाटा सुरु करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने दिला आहे. परंतु, कमी कर्मचाºयांमध्ये हे शक्य नाही.
>वैद्यकीय अधिकारी काही प्रमाणात बरे होऊन कामावर रुजू होत आहेत. परंतु, महिला कर्मचाºयांची संख्या अपुरी आहे. त्यांच्यावर कामाचा ताण आहे. पुरुष कर्मचारी सध्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. महिला कर्मचाºयांची संख्या वाढवून मिळावी, यासाठी प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला आहे.
- डॉ. प्रतिभा सावंत - डीन, कळवा रुग्णालय