Coronavirus News: ठाण्यातील तीन अधिकाऱ्यांसह १४ पोलिसांना कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 11:06 PM2020-06-22T23:06:23+5:302020-06-22T23:09:17+5:30

ठाणे शहर पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या ४८ तासांमध्ये तीन अधिका-यांसह १४ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये राज्य राखीव पोलीस दलातील (एसआरपीएफ) तीन जवानांचाही समावेश आहे.

Coronavirus News: Coronavirus infected 14 policemen including three officers from Thane | Coronavirus News: ठाण्यातील तीन अधिकाऱ्यांसह १४ पोलिसांना कोरोनाची लागण

राज्य राखीव पोलीस दलाच्या तिघांचा समावेश

Next
ठळक मुद्देराज्य राखीव पोलीस दलाच्या तिघांचा समावेशएकाच दिवसात नऊ जणांना बाधा

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: गेल्या ४८ तासांमध्ये तीन अधिकाºयांसह १४ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये राज्य राखीव पोलीस दलातील (एसआरपीएफ) तिघांचा समावेश आहे. सध्या ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील बाधित पोलिसांची संख्या ३६४ इतकी झाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २० जून रोजी भिवंडी परिमंडळातील नारपोली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आणि एका उपनिरीक्षकाला कोरोनाची बाधा झाली. त्यापाठोपाठ भिवंडीमध्येच नेमणूकीला असलेल्या एसआरपीएफच्या एका हवालदारासह तीन पोलीस कर्मचाºयांचाही अहवाल पॉझिटीव्ह आला. या तिघानांही भिवंडीच्या अंजूरफाटा येथील ओसवाल रुग्णालयात दाखल केले आहे. तर २१ जून रोजी चितळसर पोलीस ठाण्याच्या एका उपनिरीक्षकासह दोघांना लागण झाली. त्यांना दोन वेगवेगळया रुग्णालयांमध्ये दाखल केले आहे. तर नारपोली पोलीस ठाण्याच्या दोन कर्मचाºयांनाही रविवारी लागण झाल्याचे समोर आले. त्यापाठोपाठ कोपरी, वाहतूक नियंत्रण शाखा आणि ठाणे मुख्यालयातील प्रत्येकी एकाला तर मोटार परिवहन विभागातील दोघांना कोरोनाची लागण झाली. रविवारी एकाच दिवशी नऊ पोलिसांना लागण झाल्याचे समोर आले. आतापर्यंत ३३ अधिकारी आणि ३२८ कर्मचारी बाधित झाल्यामुळे बाधित पोलिसांची संख्या ३६४ इतकी झाली आहे. आतापर्यंत २७३ पोलिसांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली.

Web Title: Coronavirus News: Coronavirus infected 14 policemen including three officers from Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.