Coronavirus News: ्र्र्दोन अधिकाऱ्यांसह ११ पोलिसांना कोरोनाची लागण: पोलीस हवालदाराचा मृत्यु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 08:52 PM2020-09-16T20:52:13+5:302020-09-16T20:55:04+5:30
कोरोनामुळे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हवालदाराचा मृत्यु झाल्याची घटना बुधवारी घडली. तर दोन अधिकाऱ्यांसह ११ पोलीस कोरोनामुळे बाधित झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे एक निरीक्षक आणि गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक या दोन अधिकाºयांसह ११ पोलिसांना बुधवारी कोरोनाची लागण झाली. तर भिवंडीच्या भोईवाडा पोलीस ठाण्याचे हवालदार भगवान वांगड यांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. त्यामुळे पोलिसांमधील मृतांची संख्या २२ वर गेली आहे.
वांगड यांची प्रकृती १५ सप्टेंबर रोजी खालावल्यामुळे त्यांची भिवंडीतील इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पीटल येथे कोरोना तपासणी केली होती. ही तपासणी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान १५ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यु झाला. दरम्यान, वागळे इस्टेटचे वरिष्ठ निरीक्षक, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक तसेच वाहतूक शाखेचे चार हवालदार, मुख्यालय, मानपाडा, मध्यवर्ती आणि डोंबिवली येथील नऊ कर्मचारी बुधवारी बाधित झाले. आतापर्यंत १४८ अधिकारी आणि १२८६ कर्मचारी अशा एक हजार ४३४ जणांना कोरोनाची लागण झाली. सध्या ३३ पोलिसांना घरातच कॉरंटाईन ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.