CoronaVirus News : अंबरनाथ, बदलापूरमधील कोव्हिड टेस्टचे रिपोर्ट रखडले; उल्हासनगरच्या लॅबमध्ये नमुने पाठवण्याची वेळ 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 08:14 PM2021-04-02T20:14:35+5:302021-04-02T20:15:25+5:30

CoronaVirus News : अंबरनाथ शहरात सध्या १ हजार २१३ निकाल प्रलंबित आहेत. तर बदलापूर शहरात सध्या २५० चाचण्यांचे निकाल प्रलंबित आहेत. 

CoronaVirus News: Covid test report stalled in Ambernath, Badlapur; Time to send samples to Ulhasnagar lab | CoronaVirus News : अंबरनाथ, बदलापूरमधील कोव्हिड टेस्टचे रिपोर्ट रखडले; उल्हासनगरच्या लॅबमध्ये नमुने पाठवण्याची वेळ 

CoronaVirus News : अंबरनाथ, बदलापूरमधील कोव्हिड टेस्टचे रिपोर्ट रखडले; उल्हासनगरच्या लॅबमध्ये नमुने पाठवण्याची वेळ 

Next

अंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील कोरोना चाचणीचे नमुने तपासणाऱ्या लॅबमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे या दोन्ही शहरातील कोव्हिड टेस्टचे रिपोर्ट गेल्या दोन दिवसांपासून रखडले आहेत. (CoronaVirus News : Covid test report stalled in Ambernath, Badlapur; Time to send samples to Ulhasnagar lab)

बदलापूरला शासनाच्यावतीने कोव्हिड टेस्टिंग लॅब सुरु करण्यात आली होती. एक एनजीओ ही लॅब चालवत असून त्यात अंबरनाथ आणि बदलापूरमधील आरटी पीसीआर चाचण्यांचे नमुने तपासले जात आहेत. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून या लॅबमधील मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला असून त्यामुळे अंबरनाथ आणि बदलापूरमधील कोरोना चाचणीचे निकाल प्रलंबित आहेत. 

बदलापूरमध्ये दिवसाला २०० ते २५० आणि अंबरनाथमध्ये दिवसाला जवळपास ४०० संशयितांच्या आरटी पीसीआर चाचण्या केल्या जात आहेत. मात्र या चाचण्यांचे नमुने तपासलेच जाऊ शकत नसल्याने सगळे निकाल प्रलंबित आहेत. अंबरनाथ शहरात सध्या १ हजार २१३ निकाल प्रलंबित आहेत. तर बदलापूर शहरात सध्या २५० चाचण्यांचे निकाल प्रलंबित आहेत. 

बदलापूरचे लॅब बंद असल्याने हे नमुने सध्या पडघा, ठाणे, उल्हासनगर इथल्या सरकारी लॅबमध्ये, तसेच कल्याणच्या एका खासगी लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात येत आहेत. मात्र खासगी लॅबमध्ये एका चाचणीला ५०० रुपये शुल्क भरावे लागणार असून हा भुर्दंड पालिकेला सोसावा लागणार आहे.

टेस्टिंग लॅबच्या यंत्रामध्ये बिघाड झाल्यामुळे तीन ते चार टेस्ट रिपोर्ट येणार नाहीत. मात्र, पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.
  - डॉ. राजेश अंकुश, वैद्यकीय अधिकारी, कुळगाव बदलापूर नगरपरिषद

 लॅब बंद झाली असली तरी चाचणी पडघा आणि ठाणे येथे पाठवून त्याचे लगेच रिपोर्ट घेतले जात आहेत. रिपोर्ट येण्यास थोडा विलंब होईल परंतु काम थांबलेले नाही. 
- डॉ. धीरज चव्हाण, अतिरिक्त मुख्याधिकारी, अंबरनाथ नगरपरिषद

Web Title: CoronaVirus News: Covid test report stalled in Ambernath, Badlapur; Time to send samples to Ulhasnagar lab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.