CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत घट; दिवसभरात ३५ जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 07:21 PM2020-10-20T19:21:54+5:302020-10-20T19:23:52+5:30

CoronaVirus News : ठाणे परिसरात २१३ रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. शहरात ४४ हजार ३०६ रुग्णांची नोंद आतापर्यंत झाली आहे.

CoronaVirus News: Decrease in the number of corona patients in Thane district; 35 people died in one day | CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत घट; दिवसभरात ३५ जणांचा मृत्यू 

CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत घट; दिवसभरात ३५ जणांचा मृत्यू 

Next
ठळक मुद्देउल्हासनगरात ४२ नवे रुग्ण आढळले आहे. तर, दोघांचा मृत्यू झाला आहे. या शहरात नऊ हजार ९३३ रुग्ण संख्या झाली आहे.

ठाणे : जिल्ह्यात प्रथमच मंगळवारी कोरोनाचे ८९८ हे कमी रुग्ण आढळून आले आहेत. आता जिल्ह्यात दोन लाख दोन हजार ६३३ रुग्ण झाले आहेत. तर, आज ३५ रुग्णांचा आज मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील मृतांची संख्या पाच हजार १३५ झाली आहे. 

ठाणे परिसरात २१३ रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. शहरात ४४ हजार ३०६ रुग्णांची नोंद आतापर्यंत झाली आहे. मंगळवारी दोन जणांचा मृत्यू झाल्यामुळे आजपर्यंत एक हजार ११२ मृतांची संख्या झाली आहे. कल्याण - डोंबिवली शहरात १६७ रुग्णांची वाढ झाली असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ४८ हजार २७४ रुग्ण बाधित झाले आहेत. तर मृतांची संख्या ९६९ झाली आहे.

उल्हासनगरात ४२ नवे रुग्ण आढळले आहे. तर, दोघांचा मृत्यू झाला आहे. या शहरात नऊ हजार ९३३ रुग्ण संख्या झाली आहे,. तर, मृतांची संख्या ३२७ झालेली आहे. भिवंडी शहरात आज ३२ बाधित आढळले असून एका जणाचा मृत्यू झाला आहे. आता या शहरात बाधित पाच हजार ७०६ झाले असून मृतांची संख्या ३२९ आहे. मीरा भाईंदरमध्ये ११ रुग्णांची तर, पाच जणांच्या मृत्यूची नोंद आज केली आहे. आता बाधितांची संख्या २१ हजार ५०८  झाली आहे, तर, मृतांची संख्या ६८२ पर्यंत गेली आहे.

अंबरनाथमध्ये ३० रुग्ण नव्याने वाढले आहे. तर, आज एकही मृत्यू झाला नाही. या शहरात बाधितांची संख्या सात हजार ४९ झाली असून मृतांची संख्या २५९ वर गेली आहे. बदलापूरमध्ये २९ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या सात हजार १७ झाली आहे. या शहरात आज तीन मृत्यू झाले आहेत. त्यामुळे मृत्यूची संख्या ९६ पर्यंत गेली आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीणमध्ये ६५ रुग्णांची वाढ झाली आहे. तर, दहा जणांचा मृत्यू झाला आहे. आता बाधितांची संख्या १६ हजार २१४ असून आतापर्यंत मृतांची संख्या ५०० झाली आहे.

Web Title: CoronaVirus News: Decrease in the number of corona patients in Thane district; 35 people died in one day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.