CoronaVirus News: रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात दिरंगाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 11:21 PM2020-06-18T23:21:42+5:302020-06-18T23:21:49+5:30

तपासणी अहवालानंतरही रुग्ण दिवसभर घरीच

CoronaVirus News: Delay in hospitalization of patients | CoronaVirus News: रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात दिरंगाई

CoronaVirus News: रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात दिरंगाई

Next

वाडा : वाडा तालुक्यात कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण दररोज वाढत असून नव्याने पुढे आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांना तातडीने वैद्यकीय उपचारांसाठी दाखल करणे आवश्यक असताना प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अहवाल आल्यानंतरही संबंधित रुग्णांना दिवसभर घरीच थांबावे लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

वाडा तालुक्यात आठवडाभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. समाजात कोरोनासंदर्भात प्रचंड भीती आहे. तालुक्यातील जामघर येथे आढळलेल्या रुग्णांना अहवाल प्राप्त झाल्यानंतरही तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात प्रशासनाने उदासीनता दाखवल्याने या रुग्णांना दिवसभर घरीच थांबावे लागल्याचे उघड झाले आहे. तर, वाडा पोलीस ठाण्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर दोन दिवसांनी त्यांना वैद्यकीय उपचारासाठी पालघर येथे हलविण्यात आले. काही दिवसांपूर्वी आब्जे परिसरात आढळलेल्या रुग्णाला रुग्णवाहिके-अभावी कित्येक तास ताटकळत थांबावे लागल्याचे उघड झाले आहे.

कोरोना चाचणीचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर तातडीने रु ग्णांना वैद्यकीय उपचार मिळणे गरजेचे असताना आणि ग्रामीण भागात सुरक्षित अंतर ठेवण्याच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना नसल्याने पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात येण्याचे प्रमाण अधिक असल्याने प्रशासनाने तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे.

तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली असून फक्त दोन रुग्णवाहिका तालुक्यासाठी आहेत. आता आणखी बसचीही व्यवस्था करण्यात आली असून त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांना लवकरात लवकर कोविड सेंटरपर्यंत पोहोचवता येईल.
- उद्धव कदम, तहसीलदार, वाडा

Web Title: CoronaVirus News: Delay in hospitalization of patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.