CoronaVirus News : मुंबईत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना केडीएमसी हद्दीत जाण्यास प्रतिबंध

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 03:27 PM2020-05-05T15:27:57+5:302020-05-05T16:05:11+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: येत्या 8 मे पासून या कर्मचाऱ्यांना मुंबईतील कल्याण डोंबिवली शहरात येण्या-जाण्यास प्रतिबंध करण्यात येत असल्याची माहिती आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.

CoronaVirus News Employees working in Mumbai barred from entering KDMC SSS | CoronaVirus News : मुंबईत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना केडीएमसी हद्दीत जाण्यास प्रतिबंध

CoronaVirus News : मुंबईत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना केडीएमसी हद्दीत जाण्यास प्रतिबंध

Next

कल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 200 पार केली आहे. या आकडेवारीपैकी सगळ्य़ात जास्त रुग्ण हे मुंबईला जाणारे अत्यावश्यक सेवेतील सरकारी आणि खासगी कर्मचारी आहेत. ते कोरोनामुळे बाधित झाले आहे. येत्या 8 मे पासून या कर्मचाऱ्यांना मुंबईतील कल्याण डोंबिवली शहरात येण्या-जाण्यास प्रतिबंध करण्यात येत असल्याची माहिती आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.

सरकारी व खासगी रुग्णालयात सेवा देणारे नर्स, डॉक्टर, तंत्रज्ञ यांच्यासह पोलीस, औषध कंपन्यांत काम करणारे कामगार हे कल्याण डोंबिवलीत राहतात. लॉकडाऊन लागू झाल्यापासून हे कर्मचारी अत्यावश्यक सेवा पुरवित आहेत. त्याकरीता त्यांना मुंबईत जाण्याकरीता प्रवास करावा लागतो. या कर्मचाऱ्याना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली शहरातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा हा जास्त दिसत आहे. या कर्मचाऱ्यांची त्यांच्या कुटुंबासह व्यवस्था मुंबईत करण्यात यावी. तसेच त्यांच्या आरोग्याची तपासणी केली जावी. त्याचबरोबर त्यांच्याकरीता कोरोना रुग्णालय सुरू करावे, अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील, कल्याण डोंबिवली महापालिकेचे स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे व आगरी यूथ फोरमचे अध्यक्ष गुलाब यांनी सरकारकडे केली होती. 

मागण्याची दखल घेत सरकारी व खासगी रुग्णालयात काम करण्याची व्यवस्था मुंबईतील ते काम करीत असलेल्या जवळच्या हॉटेलमध्ये मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्याचबरोबर खासगी कंपन्या, बँकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यांची व्यवस्था स्वत: ते काम करीत असलेल्या आस्थापनेच्या नजीक कराचयी आहे. कर्मचाऱ्यांनी नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर नमूद करायचा आहे. त्यासाठी सरकारी सेवेतील कर्मचाऱ्यांनी ‘केडीएमसी.कोविड19.जीओव्ही अ‍ॅटदीरेट जीमेल डॉटकॉम’ या इमेल आयडीवर तर खासगी कर्मचाऱ्यांनी  ‘केडीएमसी.कोविड19.पीव्हीटी अ‍ॅटदीरेट जीमेल डॉटकॉम’वर या इमेल आयडीवर पाठविण्याचे आवाहन केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

CoronaVirus News : कोरोनाचा हाहाकार! जगभरात तब्बल 2,52,675 जणांचा मृत्यू; अमेरिकेत परिस्थिती गंभीर

CoronaVirus News : खोकल्याचं औषध घेत असाल तर वेळीच व्हा सावध, वाढू शकतो कोरोनाचा धोका?

 

Web Title: CoronaVirus News Employees working in Mumbai barred from entering KDMC SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.