CoronaVirus News : डोंबिवलीत लॉकडाऊनच्या टप्प्याला दुकानदार, नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद, रिकाम्या बसेस धावल्या अन् रांगा ओसरल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 08:54 AM2020-07-02T08:54:58+5:302020-07-02T08:57:51+5:30
CoronaVirus News : शहरात तुलनेने लॉकडाऊनच्या तीन महिन्यांच्या काळातील जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या लॉकडाऊनला जास्त प्रतिसाद मिळत असल्याची चर्चा पोलीस, राज्य परिवहन कामगारांच्या वर्तुळात सुरू होती.
अनिकेत घमंडी,
डोंबिवली: शहरात 2 जुलैपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला असल्याचे सुरुवातीला तरी दिसून आले आहे. एरव्ही सकाळच्या वेळी कामावर जण्यासाठी इंदिरा गांधी चौकात लागणाऱ्या हजारो कामगारांच्या रांगा गुरुवारी लागलेल्या नव्हत्या, राज्य परिव्हनच्या बसेस रिकाम्या धावल्याचे चित्र निदर्शनास आले. बाजारपेठमधील दुकाने बंद, रस्त्यावर शुकशुकाट आणि अभावाने खासगी वाहने रस्त्यावर दिसून आली. केंद्र, राज्य शासनाचे अत्यावश्यक सेवेतील कामगारांना तसेच बँक, पोस्ट आदी शासकीय सेवतील कर्मचाऱ्यांना देखील रेल्वे सुविधा मिळाल्याने त्या कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण होते. शहरात तुलनेने लॉकडाऊनच्या तीन महिन्यांच्या काळातील जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या लॉकडाऊनला जास्त प्रतिसाद मिळत असल्याची चर्चा पोलीस, राज्य परिवहन कामगारांच्या वर्तुळात सुरू होती. त्या कामगारांना नियोजन करण्यात सुटसुटीतपणा आल्याचे सांगण्यात आले.
नागरिकही जेवढ्या मोठ्या प्रमाणात भाजी बाजारासाठी येत होते ते गुरुवारी बाजारासाठी आले नसल्याने लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. रिक्षा वाहतूक अभावाने ज्यांना अनलॉक सेवेची परवानगी देण्यात आली आहे ते रस्त्यावर आढळून आले. अत्यावश्यक सेवेखेरीज कोणीही बसने फारसे गेले नसल्याचे राज्य परिवहन मंडळाच्या व्यवस्थापनाने सांगितले.