CoronaVirus News : शंभर वर्षीय आजीबाईंची कोरोनावर यशस्वी मात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 01:00 AM2020-06-24T01:00:18+5:302020-06-24T01:00:26+5:30
शंभर वर्षांच्या आजीबाईंनी कोरोनावर यशस्वी मात करून मंगळवारी घर गाठले. या वेळी जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना आनंदी वातावरणात निरोप दिला.
ठाणे : ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अनुक्रमे ८५, ९१ आणि शंभर वर्षांच्या आजीबाईंनी कोरोनावर यशस्वी मात करून मंगळवारी घर गाठले. या वेळी जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना आनंदी वातावरणात निरोप दिला.
ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात केवळ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी शहरातील विविध भागांत राहणाऱ्या या तीन आजीबार्इंना कोरोनाने विळख्यात घेतेले. इच्छाशक्ती आणि रोगप्रतिकार शक्तीच्या जोरावर या तिन्ही आजींनी कोरोनावर मात केली. यामध्ये शहरातील मध्यवर्ती भागातील आंबेडकर रोड येथे राहणाºया १०० वर्षीय आजीबार्इंसह रघुनाथनगर येथे राहणाºया ९१ वर्षीय तर जिल्हा रुग्णालयाच्या शेजारील पोलीस लाइन परिसरात राहणाºया ८५ वर्षीय आजीबार्इंनी कोरोनावर विजय मिळविला. तिन्ही आजींना रुग्णालय प्रशासनाने शुभेच्छा दिल्या.
>१२ हजार रुग्णांची मात
सध्याच्या घडीला जिल्ह्यात बाधित रुग्णांची संख्या २३ हजारांच्या पार गेली आहे. तर मृतांची संख्या ८१२ झाली आहे. या आजारावर सुमारे १२ हजार रुग्णांनी यशस्वी मात करून घर गाठले आहे.