CoronaVirus News: ठाणे जिल्ह्यात १२२६ रुग्णांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 03:08 AM2020-08-14T03:08:42+5:302020-08-14T03:08:54+5:30

ठाणे मनपाच्या कार्यक्षेत्रात १९३ नवे रुग्ण आढळल्यामुळे शहरात आता कोरोनाच्या २२ हजार ७२३ रुग्णांची नोंद झाली आहे. तर, आठ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या ७२१ झाली आहे.

CoronaVirus News: An increase of 1226 patients in Thane district | CoronaVirus News: ठाणे जिल्ह्यात १२२६ रुग्णांची वाढ

CoronaVirus News: ठाणे जिल्ह्यात १२२६ रुग्णांची वाढ

Next

ठाणे : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांमध्ये गुरुवारी एक हजार २२६ ने नव्याने वाढ झाली. यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या आता एक लाख दोन हजार ८०२ झाली असून ५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात दोन हजार ९२५ मृतांची नोंद झाली आहे.

ठाणे मनपाच्या कार्यक्षेत्रात १९३ नवे रुग्ण आढळल्यामुळे शहरात आता कोरोनाच्या २२ हजार ७२३ रुग्णांची नोंद झाली आहे. तर, आठ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या ७२१ झाली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात ३३० रुग्ण नव्याने आढळले. तर, नऊ जणांचा मृत्यू झाल्यामुळे या शहरातील मृतांची संख्या ४७५ झाली. तर, २३ हजार ५४७ रुग्ण या शहरात बाधित झाल्याची नोंद झाली आहे.

वसई-विरारमध्ये २५५ रुग्ण कोरोनामुक्त
वसई : वसई-विरार शहरात गुरुवारी २५५ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले. यामुळे ११ हजार १९२ रुग्णांनी आजवर कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, दिवसभरात १७४ रुग्ण आढळून आले असून नालासोपारामध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधित रुग्णांची संख्या १४ हजार १५७ वर पोहचली आहे.

रायगडमध्ये ४०८ रुग्ण
अलिबाग : रायगड जिल्ह्यात गुरुवारी ४०८ पॉझिटिव्ह रु ग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या १९ हजार ५७५ आहे. त्यापैकी १६ हजार १८० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.५०० रुग्ण उपचारानंतर बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. तर २९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: CoronaVirus News: An increase of 1226 patients in Thane district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.