CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात दिवसभरात नव्या १९९५ रुग्णांची वाढ; केडीएमसीत सर्वाधिक रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 01:35 AM2020-09-19T01:35:54+5:302020-09-19T01:36:18+5:30
ठाणे महापालिकेच्या क्षेत्रात ४०९ नवे रुग्ण सापडले आहेत. तर चार जणांचा मृत्यू झाल्यामुळे आता मृतांची संख्या ९२२ झाली आहे.
ठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या एक हजार ९९५ रुग्णांचा शोध शुक्रवारी घेण्यात आला. या रुग्णांसह जिल्ह्यात एक लाख ५५ हजार १३४ रुग्णांची आतापर्यंत नोंद घेण्यात आली आहे. तर २९ जणांचा मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यातील मृतांचा आकडा चार हजार ८२ वर गेला असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिली.
ठाणे महापालिकेच्या क्षेत्रात ४०९ नवे रुग्ण सापडले आहेत. तर चार जणांचा मृत्यू झाल्यामुळे आता मृतांची संख्या ९२२ झाली आहे. कल्याण - डोंबिवली (केडीएमसी) मनपा परिसरात सर्वाधिक ५९१ रुग्ण नव्याने आढळून आले असून, सात जणांचा मृत्यू झाला आहे. उल्हासनगरला ७१ नवे रुग्ण तर तीन मृत्यू झाला आहे. भिवंडी मनपा कार्यक्षेत्रात ३७ रुग्ण नव्याने सापडले असून, एकाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मीरा-भार्इंदर महापालिकेच्या क्षेत्रात १९२ रुग्णांसह सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
नवी मुंबईत ३६८ रुग्ण वाढले
नवी मुंबई : शहरात दिवसभरात ३६८ रुग्ण वाढले आहेत. एकूण रुग्णांची संख्या ३२३७१ झाली आहे. नवी मुंबईमध्ये दिघा वगळता इतर सातही विभागात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. तर शुक्रवारी दिवसभरात ३४५ रुग्ण बरे झाले असून उपचारादरम्यान चौघांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीमध्ये ३५६५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
वसई-विरारमध्ये १८५ नवे रुग्ण
वसई : वसई-विरार शहरात शुक्रवारी दिवसभरात दोन रुग्णांचा मृत्यू झाला, तर नवीन बाधित रुग्णसंख्या १८५ने वाढली आहे. तर दिवसभरात २१६ रुग्ण विविध रुग्णालयांतून मुक्त झाले आहेत. सध्या शहरात २,२१२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
- अंबरनाथ शहरात ५७ रुग्ण नव्याने आढळले असून, एकाचा मृत्यू झाला आहे. बदलापूरमध्ये ९१ रुग्ण सापडले असून शुक्रवारीही एकाचाही मृत्यू झालेला नाही. ठाणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातही १७९ रुग्णांची वाढ झाली असून, तीन मृत्यू झाले आहेत.
रायगडमध्ये 615 जणांना कोरोनाची लागण
अलिबाग : रायगड जिल्ह्यात शुक्रवारी ६१५ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात १६ जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी दिवसभरात पनवेल महापालिका क्षेत्रात २१५, पनवेल ग्रामीणमध्ये ७५, उरण ५, खालापूर ३०, कर्जत ३४, पेण ७८, अलिबाग ५६, मुरुड ३, माणगाव २४, तळा ७, रोहा २६, सुधागड २, श्रीवर्धन ४, म्हसळा ४, महाड ३४, पोलादपूर १८ असे एकूण ६१५ रुग्ण सापडले आहेत. तर दिवसभरात एकूण ७९० रुग्ण उपचारांनंतर बरे होऊन घरी गेले आहेत.