Coronavirus News: हॉस्पिटलसाठी पैसे जमा करणार जितो आणि एमसीएचआय; जबाबदारीसाठी मात्र महापालिका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 02:50 PM2020-07-09T14:50:08+5:302020-07-09T14:51:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : रुग्णालय चालविण्याचा अनुभव विचारात घेऊन ग्लोबल हब येथील एक हजार २४ खाटांचे रुग्णालय उभारण्याचे ...

Coronavirus News: Jito and MCHI to raise money for hospital; Municipal Corporation for responsibility! | Coronavirus News: हॉस्पिटलसाठी पैसे जमा करणार जितो आणि एमसीएचआय; जबाबदारीसाठी मात्र महापालिका!

पालिकेने खुलासा करण्याची भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी केली मागणी

Next
ठळक मुद्दे हॉस्पिटलमध्ये जीतो ट्रस्ट- एमसीएचआयची नक्की जबाबदारी कोणती? पालिकेने खुलासा करण्याची भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी केली मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: रुग्णालय चालविण्याचा अनुभव विचारात घेऊन ग्लोबल हब येथील एक हजार २४ खाटांचे रुग्णालय उभारण्याचे काम जितो मेडिकल ट्रस्ट आणि एमसीएचआयला पालिकेने दिले. त्यासाठी त्यांनी बिल्डरांकडून निधीही जमविला. मात्र, आता मृतदेह अदलाबदलीसह रु ग्णालयातील गलथान कारभाराच्या गोंधळात जितो ट्रस्ट आणि एमसीएचआय नामानिराळे झाले. त्यामुळे या हॉस्पिटलमध्ये जीतो ट्रस्टसह एमसीएचआयची नक्की जबाबदारी कोणती? याचा खुलासा महापालिका प्रशासनाने करावा, अशी मागणी भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी पत्राद्वारे केला आहे
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने एक हजार बेडचे रु ग्णालय उभारण्याची घोषणा केली होती. त्यावेळी जितो ट्रस्ट आणि एमसीएचआयकडे सर्व जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांना तत्कालीन महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी बिल्डरांकडून सीईआरचा निधी जमविण्याची परवानगीही दिली. त्यानुसार हॉस्पिटल उभारले गेले. मात्र, उद्घाटनाच्या दिवसापासूनच आजतागायत हॉस्पिटलचा कारभारामध्ये सुसुत्रता नाही. मृतदेहांची अदलाबदल झाल्याचा प्रकार उघडकीस आला असतानाच
रु ग्णालयाच्या बेजबाबदार कारभाराची लक्तरेही भाजपने मांडली. याच पार्श्वभूमीवर संबंधित रुग्णालयात जितो आणि एमसीएचआयची नक्की भूमिका काय, हा प्रश्न उपस्थित होतो.या
रु ग्णालयाच्या भोंगळ कारभाराविषयी महापालिका प्रशासनावर आरोपांच्या फैरी झडत आहेत. मात्र, त्यापासून जितो ट्रस्ट आणि एमसीएचआय नामानिराळा आहे. त्यांची भूमिका केवळ पैसे उभारण्याची होती का? केवळ इन्फ्रास्ट्रक्चर उभारून त्यांनी जबाबदारी झटकली आहे का, याचा खुलासा करावा, अशी मागणी पवार यांनी केली.
यापूर्वी ठाणे महापालिकेने हाजूरी येथील संपूर्ण इमारत जितो ट्रस्ट रु ग्णालयाला दिलेली आहे. संबंधित १२० खाटांचे रु ग्णालय कोरोनासाठी घेण्याची आवश्यकता आहे. मात्र, त्याकडेही महापालिकेने दुर्लक्ष केले आहे. जितो ट्रस्टवर एवढी मेहरबानी कशासाठी केली जात आहे? असा सवालही पवार यांनी केला आहे.
 

 

Web Title: Coronavirus News: Jito and MCHI to raise money for hospital; Municipal Corporation for responsibility!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.