Coronavirus News: गेल्या दोन दिवसात आयुक्तालयातील आणखी २६ पोलिसांना कोरोनाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 01:52 AM2020-07-01T01:52:07+5:302020-07-01T01:54:56+5:30
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील कोरोना बाधित पोलिसांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या ४८ तासांमध्येच २६ पोलिसांना कोरोनाची लागण झाली. आतापर्यंत ३३४ पोलिसांनी कोरोनावर मात केली असून २२ अधिकारी आणि १३६ कर्मचारी अशा १५८ पोलिसांवर वेगवेगळया रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: नागरिकांप्रमाणेच पोलिसांमध्येही कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या ४८ तासांमध्येच २६ पोलिसांना कोरोनाची लागण झाली. यामध्ये सात अधिकाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत ४९५ पोलिसांना लागण झाली असून ३३४ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २८ जून रोजी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील दहा तीन अधिकाऱ्यांसह दहा पोलिसांना कोरोनाची लागण झाली. त्यापाठोपाठ २९ जून रोजी आलेल्या अहवालानुसार राज्य राखीव दलाच्या (एसआरपीएफ) निरीक्षकासह टिळकनगर येथील सहायक पोलीस निरीक्षक आणि भिवंडीतील दोन उपनिरीक्षकांना कोरोनाची लागण झाली. तर एसआरपीएफचे चार कॉन्स्टेबल, मुख्यालयातील दोघे त्याचप्रमाणे बदलापूर, ठाणे नियंत्रण कक्ष, शिवाजीनगर, नारपोली, चितळसर आणि वाहतूक शाखा येथील प्रत्येकी एका कर्मचाºयाला लागण झाली. त्यामुळे एकाच दिवसात चार अधिकाºयांसह १२ कर्मचाºयांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. एसआरपीएफच्या कर्मचाºयांना मरोळ पोलीस कॅम्पमध्ये तर उर्वरित कर्मचाºयांना ठाणे, नवी मुंबई, नाशिक, डोंबिवली, काल्हेर आणि भार्इंदरपाडा आदी ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
* आतापर्यंत ५५ अधिकारी आणि ४४० कर्मचारी अशा ४९५ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये तिघांचा मृत्यु झाला. तर ३३ अधिकारी आणि ३०१ कर्मचारी अशा ३३४ पोलिसांनी कोरोनावर मात केली असून २२ अधिकारी आणि १३६ कर्मचारी अशा १५८ पोलिसांवर वेगवेगळया रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत.