CoronaVirus News : अंबरनाथमध्ये पहिल्याच दिवशी पुन्हा लॉकडाऊनचा फज्जा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 02:09 AM2020-06-24T02:09:44+5:302020-06-24T02:10:09+5:30

मंगळवारी पहिल्या दिवशी शहरातील सर्व दुकाने बंद असली तरीही शहरातील गर्दी किंचितही कमी झाली नव्हती. त्यामुळे हा लॉकडाऊन नेमका कुणासाठी आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

CoronaVirus News : Lockdown again on the first day in Ambernath | CoronaVirus News : अंबरनाथमध्ये पहिल्याच दिवशी पुन्हा लॉकडाऊनचा फज्जा

CoronaVirus News : अंबरनाथमध्ये पहिल्याच दिवशी पुन्हा लॉकडाऊनचा फज्जा

Next

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने सापडत असल्याने शहरात पुन्हा लॉकडाऊन करावा अशी मागणी राजकीय
आणि सामाजिक संघटनांनी केली होती. त्यानुसार २३ ते ३० जूनपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मंगळवारी पहिल्या दिवशी शहरातील सर्व दुकाने बंद असली तरीही शहरातील गर्दी किंचितही कमी झाली नव्हती. त्यामुळे हा लॉकडाऊन नेमका कुणासाठी आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मंगळवारपासून शहरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले असले तरी शहरातील गर्दीवर नियंत्रण मिळविण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. आज शहरातील बहुसंख्य दुकाने आणि भाजी विक्रेत्यांची दुकाने बंद होती. असे असले तरी शहरातील वाहतूक आणि नागरिकांची गर्दी किंचितही कमी झालेली दिसली नाही. त्यामुळे अंबरनाथकरांना फायदा होणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
>अंबरनाथच्या पश्चिम भागात रस्त्यावर नागरिक विनाकारण फिरताना दिसत होते. तर अनेक नागरिक दुचाकीवर विनाकारण फिरत होते. या सर्वांना रोखण्यात पोलिसांना अडचणी येत होत्या. शहरात परिस्थिती भयंकर असतानाही नागरिक सतर्कता दाखवत नसल्याचे दिसत आहे. एमआयडीसी सुरु असल्याने नियमित कामावर जाणारे कामगार आपल्या ठरलेल्या वेळेवर निघून गेले तर दुसरीकडे किराणामाल भरण्याच्या नावावर नागरिक बाहेर फिरत होते. या सर्वांना रोखण्यासाठी पोलिसांचा कोणताही खास बंदोबस्त शहरात नव्हता.
>दारूची दुकाने सुरू
शहरात लॉकडाऊन जाहीर झालेला असतानाही शहरातील काही मुजोर दारू विक्रेत्यांनी आपली दुकाने सुरू ठेवली होती. या दुकानात नागरिकांनी गर्दी केली होती. अखेर पालिकेने या दुकानदारांवर कारवाई केली. स्टेशन रोडवरील अंबर वाईन्स या दुकानदाराने सकाळपासूनच दुकान सुरू ठेवल्याने त्याच्यावरही पालिकेने कारवाईचा बडगा उगारला.

Web Title: CoronaVirus News : Lockdown again on the first day in Ambernath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.