CoronaVirus News: बाळकूम, कोलशेत, ढोकाळीमध्ये उत्स्फूर्त लॉकडाऊन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 02:34 PM2020-06-30T14:34:34+5:302020-06-30T14:34:58+5:30
CoronaVirus News: या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी नागरिकांकडूनच केली गेली आहे. इतर अत्यावश्यक सेवेची दुकाने देखील बंद होती.
ठाणे : संपूर्ण ठाण्यात लॉकडाऊन गोंधळ असताना गेल्या १५ दिवसात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर माजिवडा- मानपाडा प्रभाग समितीच्या अंतर्गत येत असलेल्या कोलशेत ,ढोकळी आणि बाळकूम परिसरात लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनीच या भागात सोमवार पासून ७ दिवस उत्सुर्तपणे बंद सूरु केला आहे. सोमवार पासून हा लॉकडाऊन सुरु करण्यात आला असून यामध्ये केवळ मेडिकल,हॉस्पिटल,आणि दुध व्यवसायच सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी नागरिकांकडूनच केली गेली आहे. इतर अत्यायवशक सेवेची दुकाने देखील बंद होती.
ठाणे शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा वाढतच असून माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद झाली असल्याने इथल्या रहिवाशांमध्ये चिंतेचे वातारण आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे शिवसेनेचे ज्येष्ठ नागरसेवक संजय भोईर यांनी बाळकूम, कोलशेत आणि ढोकाळी परिसरातील काही सोसायटी आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांनाची बैठक घेऊन असून स्वयंस्फूर्तीने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सोमवार पासून पुढील सात दिवस हा लॉकडाऊन असणार आहे अशी माहिती भोईर यांनी दिली आहे.
या लॉकडाऊनची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी केवळ अत्यावश्यक सेवा, मेडिकल, हॉस्पिटल्स, रुग्णवाहिका तसेच दूध व्यवसाय (सकाळी ५ ते ८ वाजेपर्यंत )वगळून सर्व प्रकारचे किराणा स्टोअर्स,भाजीपाला,मच्छी विक्रेते, मटण चिकन विक्रेते सात दिवस बंद राहणार आहे. पहिल्या दिवसांपासून या भागात शुकशुकाट दिसत होता, नागरिक देखील रस्त्यावर फिरताना दिसत नव्हते."अनलॉक नंतरच रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. या परिसरात २५० पेक्षा अधिक सोसायटी असून तेवढाच ५० टक्के भाग हा झोपडपट्टीचा भाग आहे. त्यामुळे या ठिकाणचे व्यवसाय पुन्हा सुरू झाले, सोशल डिस्टेंसिंगचे पालन न केल्यामुळे संख्या वाढली असून याला आळा घालण्यासाठी हा सात दिवसांचा लॉकडाऊन उत्स्फूर्तपणे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांना देखील लॉकडाऊन हवा होता . त्यामुळे हा लॉकडाऊन घेतला असून त्याला प्रतिसाद मिळत आहे.