CoronaVirus News in Mira Bhayandar : राज्य सरकारने महापालिकांना आर्थिक मदत करावी - गीता जैन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 11:58 AM2020-05-27T11:58:40+5:302020-05-27T12:08:09+5:30
CoronaVirus News in Mira Bhayandar : "लॉकडाऊनमुळे राज्यातील महापालिकांच्या उत्पन्नांमध्ये मोठी घट झालेली आहे. बहुतांश लहान महापालिकांवर तर आधीच कर्जाचा बोजा आहे."
मीरारोड : कोरोना संक्रमणामुळे दोन महिन्याच्या लॉकडाऊनने स्थानिक स्वराज्य संस्थांचे आर्थिक उत्पन्न बंद झाले आहे. पालिका आर्थिक संकटात असताना कोरोना विरुद्ध लढण्यासाठी निधी अपुरा पडत असल्याने शासनाने आर्थिक मदत करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आमदार गीता जैन यांनी केली आहे.
लॉकडाऊनमुळे राज्यातील महापालिकांच्या उत्पन्नांमध्ये मोठी घट झालेली आहे. बहुतांश लहान महापालिकांवर तर आधीच कर्जाचा बोजा आहे. त्यात उत्पन्न बंद झाल्याने नागरिकांना दिल्या जाणाऱ्या आवश्यक सेवांवर विपरीत परिणाम होत आहे. एकीकडे कोरोना रोखण्यासाठी पालिकांना मोठा खर्च करावा लागत असून त्यासाठी देखील निधी अपुरा पडत आहे.
मुद्रांक शुल्क अधिभार, जीएसटी अनुदान मिळत नाही . शिवाय कर्मचाराऱ्यांचा पगार व अन्य अत्यावश्यक खर्च पाहता पालिकांना आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. त्यामुळे शासनाने सर्व महापालिकांना निधी देण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केल्याचे आमदार गीता जैन म्हणाल्या.
आणखी बातम्या...
Assam floods: आसाम-मेघालयात पुराचा तडाखा, जनजीवन विस्कळीत!
ट्विटरने पहिल्यांदाच डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा
CoronaVirus News : दुर्दैवी! एकही सुट्टी न घेता केलं अहोरात्र काम पण कोरोना योद्ध्याने गमावला प्राण
CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये घर सोडून पळून जातायेत चिमुकले; कारण वाचून बसेल धक्क