CoronaVirus : आमदार राजू पाटलांची कल्पना, मनसेकडून डोंबिवली रेल्वेस्थानक परिसरात चाकरमान्यांच्या स्क्रिनिंगला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 12:44 AM2020-07-29T00:44:40+5:302020-07-29T00:46:55+5:30
याच प्रकारचा प्रयत्न धारावीतही करण्यात आला होता तो यशस्वी झाला. मात्र, अत्यावश्यक सेवेसाठी डोंबिवलीतील अनेक कर्मचारी मुंबई नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आदी ठिकाणी रेल्वे अथवा बसने प्रवास करतात. यात बॅंक कर्मचारी, आरोग्य सेवक, पोलीस आदींचा समावेश आहे. यांपैकी सकाळी लवकर जाणारे आणि उशिरा घरी परतणाऱ्या कर्मचाऱ्यांची तपासणी होत नाही.
ठाणे : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका परिसरात कोरोनाचा कहर सुरूच आहे. लॉकडाऊननंतर कोरोना रूग्ण संखेला काही प्रमाणावर आळा बसला आहे. सध्या अनेक उपाय योजनांसह, महापालिका प्रशासनाच्या मदतीने, मनसे, काही नगरसेवक आणि विवीध स्वयंसेवी संघटनांचे कार्यकर्त्ये घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करत आहेत. तसेच कोरोना रुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांना उपचार देवून त्यांच्यापासून होणारे संक्रमण थांबविण्याचा प्रयत्न करत आहेत. याचाच एक भाग म्हणून आता आमदार राजू पाटील यांच्या मार्फत रेल्वेस्थानक परिसरात डोंबिवलीकर चाकरमान्यांच्या स्क्रिनिंगला सुरुवात करण्यात आली आहे.
याच प्रकारचा प्रयत्न धारावीतही करण्यात आला होता तो यशस्वी झाला. मात्र, अत्यावश्यक सेवेसाठी डोंबिवलीतील अनेक कर्मचारी मुंबई नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आदी ठिकाणी रेल्वे अथवा बसने प्रवास करतात. यात बॅंक कर्मचारी, आरोग्य सेवक, पोलीस आदींचा समावेश आहे. यांपैकी सकाळी लवकर जाणारे आणि उशिरा घरी परतणाऱ्या कर्मचाऱ्यांची तपासणी होत नाही.
केडीएमसी परिसरातील कोरोना रूग्णांचा इतिहास बघितला, तर त्यात अत्यावश्य सेवेसाठी बाहेर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचेच प्रमाण अधिक आहे. हे लक्षात घेत आजपासून मनसे आमदार राजू पाटील यांच्या संकल्पनेतून, मनसेच्या वतीने काही दिवस, अशा कर्मचाऱ्यांची स्क्रिनिंग करून त्यांना मार्गदर्श केले जाणार आहे.
या तपासणी केंद्रावर थर्मल टेंम्परेचर चेकिंग आणि ऑक्सिमिटरच्या सहाय्याने ऑक्सिजन पातळीची तपासणी करण्यात येत आहे. तसेच संभाव्य कोरोनाबाधित आढळल्यास त्या कर्मचाऱ्यांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे.
या स्क्रिनिंग केंद्रांवर तपासणी करून आपली, आपल्या कुटुंबाची आणि शहराच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सहकार्य करावे. तसेच कोरोनाच्या पडलेल्या विळख्यातून शहराची सुटका करण्यास हातभार लावावा, असे आवाहन आमदार राजू पाटील यांनी या कर्मचाऱ्यांना केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या -
Coronavirus Vaccine : जगभरात 150 व्हॅक्सीनवर काम सुरू; पण रेसमध्ये टॉपवर फक्त 'या' 4 लसी
युवकाच्या 'जीन्स'मध्ये घुसला 'कोब्रा', खांबाला धरून काढावी लागली अख्खी रात्र; मग...
CoronaVirus : भारतात 'या' 5 ठिकाणी होणार कोरोना लसीची चाचणी, असे निवडले जातायत लोक
भारत-इस्रायलची कमाल!; आता फक्त आवाज अन् श्वासावरून मिळणार कोरोना चाचणीचा अहवाल
100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर