CoronaVirus News: मुंबई- ठाण्याची अनलॉकच्या दिशेने वाटचाल सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 09:48 PM2020-06-08T21:48:07+5:302020-06-08T21:51:01+5:30

राज्य सरकारने मिशन बिगिन अगेन सुरु केल्यानंतर लॉकडाऊनच्या नियमांमध्येही शिथिलता आणली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केवळ दहा टक्के कर्मचाऱ्यांना कार्यालयांमध्ये परवानगी दिली आहे. मात्र, रेल्चेची उपनगरी सेवा अद्याप९ सुरु झालेली नाही. त्यामुळे मुंबईत जाण्यासाठी अनेक चाकरमान्यांनी खासगी वाहनांचा आधार घेतल्यामुळे मुंबई पूर्व द्रूत गती मार्गावर सोमवारी मोठी वाहतूक कोंडी झाली झाल्याचे चित्र पहायला मिळाले.

CoronaVirus News: Mumbai-Thane on its way to unlock | CoronaVirus News: मुंबई- ठाण्याची अनलॉकच्या दिशेने वाटचाल सुरु

ठाण्यातील आनंदनगर टोल नाक्यावर वाहतूक कोंडी

Next
ठळक मुद्देअपुऱ्या बस सेवेमुळे दिव्यात प्रवाशांच्या तर आनंदनगर टोलनाक्यावर वाहनांच्या रांगाठाण्यातील आनंदनगर टोल नाक्यावर वाहतूक कोंडीअनेक चाकरमान्यांनी घेतला खासगी वाहनांचा आश्रय

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: सोमवारपासून खासगी तसेच शासकीय कार्यालयांमध्ये १० टक्के कमचाºयांच्या उपस्थितीला राज्य शासनाने हिरवा कंदिल दिल्याने आपले कार्यालय गाठण्यासाठी चाकरमान्यांना मोठा द्रविडी प्राणायम करावा लागला. मुंबईकरांची ‘लाईफलाईन’ असलेली रेल्वे सेवा मात्र अद्यापही सुरु न झाल्यामुळे अनेकांना खासगी वाहनाने मुंबई गाठावी लागल्याचे चित्र होते. त्यामुळे सकाळी दोन ते तीन तास ठाण्याच्या वेशीवर वाहतूकीची मोठी कोंडी झाल्याचे चित्र पहायला मिळाले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सुमारे अडीच महिन्यांपासून सुरु असलेले ‘लॉकडाऊन’चे नियम आता ५ जूनपासून राज्य शासनाने शिथिल केले आहेत. ८ जूनपासून दहा टक्के उपस्थितीसह खासगी आणि शासकीय कार्यालय देखिल सुरु झाली आहेत. मुंबईतील अनेक कार्यालयांमध्ये नोकरी व्यावसानिमित्त जाणारा चाकरमानी वर्ग मोठया प्रमाणात ठाणे जिल्हयातील ठाणे शहर, कल्याण,डोंबिवली, शहापूर, अंबरनाथ आणि बदलापूर या भागात वास्तव्याला आहे. अत्यावश्यक सेवेतील रुग्णालये, पाणी पुरवठा विभाग, पोलीस, अग्निशमन दल, सुरक्षा रक्षक आणि प्रसारमाध्यमांमध्ये काम कारणारे प्रतिनिधी असा मोठा वर्गही ठाणे जिल्हयातून मुंबईकडे जातो. अजूनही उपनगरी रेल्वेची लोकल सेवा सुरू न झाल्यामुळे बहुतांश चाकरमान्यांनी आपल्या खाजगी वाहनांनी प्रवास करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सोमवारी ठाण्यातील आनंदनगर टोल नाक्यावर सकाळी ७ ते १० या तीन तासांच्या कालावधीमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तर दुसरीकडे दिव्यातूनही मुंबईला कामावर जाणाºयांची संख्या मोठी आहे. त्याप्रमाणात बसेसची संख्या अत्यंत कमी असल्यामुळे दिवेकरांचेही हाल झाले. बससाठी प्रवाशांच्या मोठया रांगा लागल्याने काही प्रवाशांना तर पुन्हा घरी परतावे लागल्याचे एका कर्मचाºयाने सांगितले. कार्यालयांमधील उपस्थितीच्या प्रमाणात रस्त्यावर सार्वजनिक वाहने मात्र उपलब्ध नसल्यामुळे नियोजनाचा फज्जा उडाल्याचे चित्र ठाण्यात पहायला मिळाले.
* ठाणे शहरातही गर्दी
मुंबई ठाणे अनलॉक करण्यास सुरुवात झाल्याने ठाण्यातील प्रमुख रस्त्यांवर नागरिकांची तसेच वाहनांची गर्दी वाढल्याचेही सोमवारी पहायला मिळाले. सोमवारी सकाळी कार्यालय गाठण्यासाठी कर्मचारी मोठया संख्येने घराबाहेर पडल्याने रस्त्यावर वाहतूकीची वर्दळ वाढली होती. ठाणे येथील वसंतराव नाईक पूर्व द्रूतगती महामार्गावर आंनद नगर टोलनाका परिसरात मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने जाण्यासाठी वाहनांच्या रांगा लागल्याचे पहायला मिळाले.
दरम्यान, ठाणे परिवहन सेवेच्या ४० टक्के म्हणजे ३०० पैकी १०० बसेस या नेहमीप्रमाणेच सोमवारीही रस्त्यावर होत्या. या बसेस केवळ पाणीपुरवठा, पोलीस, रुग्णालयीन कर्मचारी अशा अत्यावश्यक सेवांसाठीच सध्याही सुरुच आहेत, अशी माहिती ठाणे परिवहन सेवेच्या वरिष्ठ अधिकाºयाने दिली. तर मुंबईतील बेस्टच्या फेºयांची संख्याही अद्याप वाढविण्यात न आल्याने चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले. आगामी काळात एसटी आणि सार्वजनिक उपक्रमातील बस फेºयांची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणीही कर्मचाºयांनी केली आहे.

Web Title: CoronaVirus News: Mumbai-Thane on its way to unlock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.