CoronaVirus News : महापालिका अधिकारी, पोलीस, वैद्यकीय कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 12:36 AM2020-06-23T00:36:33+5:302020-06-23T00:36:54+5:30
तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या २० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती पालिका सहायक आयुक्त मनिष हिवाळे यांनी दिली.
उल्हासनगर : महापालिका सहायक आयुक्त, मुख्य स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, दोन अभियंता यांच्यासह दोन सफाई कामगार यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या २० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती पालिका सहायक आयुक्त मनिष हिवाळे यांनी दिली.
उल्हासनगरात कोरोना रुग्णाची संख्या एक हजारपेक्षा जास्त झाली असून ‘कोरोना योद्धा’ म्हणून काम करणाऱ्यांना संसर्ग झाल्याचे उघड झाले. इतक्या मोठ्या प्रमाणावर अधिकारी, कर्मचारी यांना कोरोना झाल्यामुळे किंवा क्वारंटाइन केल्यामुळे कामकाजावर परिणाम होत असल्याने प्रशासनासमोर नवा पेचप्रसंग उभा ठाकला आहे.
गेल्या आठवड्यात मध्यवर्ती रुग्णालयातील तीन वैद्यकीय अधिकारी व आठ इतर कर्मचाºयांना संसर्ग झाला होता. त्यांच्या संपर्कातील कर्मचाºयांना क्वारंटाइन केले आहे. इतर डॉक्टर व कर्मचाºयांत भीतीचे वातावरण पसरले आहे. विविध गुन्ह्यांत अटक केलेल्या आरोपींनाही संसर्ग झाल्याचे उघड झाल्याने पोलिसांचेही धाबे दणाणले आहेत.पोलिसांनी गेल्या आठवड्यात दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच आरोपींना मध्यरात्री अटक केली. त्याच प्रमाणे हिललाइन पोलिसांनी मलंगगड परिसरातील एका खून प्रकरणात सहा आरोपींना अटक केली. त्यापैकी तीन आरोपींना कोरोना झाल्याने त्यांच्यावर कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत.