CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ९९१ रुग्णांची नव्याने वाढ, ३० जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 08:04 PM2020-08-10T20:04:36+5:302020-08-10T20:07:10+5:30

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात कोरोनाचे १५४ रुग्ण आज नव्याने आढळून आले आहेत.

CoronaVirus News: New increase of 991 corona patients in Thane district, 30 deaths | CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ९९१ रुग्णांची नव्याने वाढ, ३० जणांचा मृत्यू

CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ९९१ रुग्णांची नव्याने वाढ, ३० जणांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देशहरात २२ हजार १५८  कोरोनाच्या रुग्णांची नोंद आतापर्यंत करण्यात आली आहे.आजपर्यंत ७०० जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या एक हजार २०७ रुग्णांची सोमवारी वाढ झाली. त्यामुळे आज जिल्ह्यातील रुग्ण संंख्या ९९ हजार १५८ झाली आहे. तर ३० रुग्णांचा मृत्यू झाला असता जिल्ह्यातील मृतांची संख्या आता दोन हजार ७७७ झाली आहे. 
 
ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात कोरोनाचे १५४ रुग्ण आज नव्याने आढळून आले आहेत. शहरात २२ हजार १५८  कोरोनाच्या रुग्णांची नोंद आतापर्यंत करण्यात आली आहे. तर आज अवघे पाच जणांचा मृत्यू झालेला आहे. आजपर्यंत ७०० जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर कल्याण - डोंबिवली परिसरात २०१ रुग्णांची आज वाढ झाली. तर आठ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत २२ हजार ६५३ रुग्ण बाधीत झाले आहेत. तर मृतांची संख्या ४४८ झाली आहे. 

नवी मुंबई महापालिकेत २७४ रुग्णांची तर दोन जणांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आतापर्यंत बाधितांची संख्या १८ हजार ७५५ झाली आहे. तर, मृतांची संख्या ४७१ झाली आहे. उल्हासनगर महापालिका परिसरात आज दोन मृत्यू झाला आहे.  तर २९ नवे रुग्ण आढळले आहे. आतापर्यंत मृतांची संख्या १५९ तर सात हजार १६६ बाधीत रुग्णांची नोंद झाली आहे. 

भिवंडी महापालिका क्षेत्रात आज दहा बधीत आढळून आले. तर आज एकाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आता बाधितांची संख्या तीन हजार ७८९ झाली आहे. तर आजपर्यंत मृतांची संख्या २५९ आहे. मीरा भाईंदरमध्ये आज १३१ रुग्णांची तर, पाच जणाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या शहरात आता बाधितांची संख्या नऊ हजार ७१४ झाली, तर, मृतांची संख्या ३१८ झाली आहे. 

अंबरनाथमध्ये आज ३७ रुग्णांची वाढ तर,एकाह जणाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. आज बाधितांची संख्या चार हजार २८५ झाली. तर, मृतांची संख्या १६६ आहे. बदलापूरमध्ये ६१ रुग्णांची आज नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या दोन हजार १६१ झाली. या शहरात आजही मृत्यू झाला नाही. त्यामुळे मृत्यूची संख्या ५१ आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागात ९४ रुग्णांची वाढ झाली. आज सात मृत्यू झाले आहेत. आता बाधितांची संख्या सात हजार ५१० आणि मृतांची संख्या २०५ झाली आहे.

Web Title: CoronaVirus News: New increase of 991 corona patients in Thane district, 30 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.