CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ६० हजार पार, आरोग्य विभागाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 03:27 AM2020-07-16T03:27:31+5:302020-07-16T03:27:48+5:30
कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात सर्वाधिक ४९८ नवीन रुग्णांची तर नऊ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या १४ हजार ७४ तर मृतांची २१६ इतकी झाली.
ठाणे : ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये एक हजार ९८१ नविन रुग्णांसह ३७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे बाधितांची संख्या ६० हजार ४८८ तर मृतांची संख्या एक हजार ७२६ झाली आहे.
कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात सर्वाधिक ४९८ नवीन रुग्णांची तर नऊ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या १४ हजार ७४ तर मृतांची २१६ इतकी झाली. त्यापाठोपाठ ठाणे पालिका क्षेत्रात ४०० बाधितांसह पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या १४ हजार ४१९ तर मृतांची ५३० वर पोहोचली आहे.
मीरा-भार्इंदरमध्येही नव्याने ९९ रुग्णांची तर तिघांच्या मृत्यूची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या पाच हजार ९५०; तर मृतांची २१० झाली. भिवंडी पालिका क्षेत्रात ५४ बाधित तर सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या दोन हजार ९०४; तर मृतांची संख्या १५४ वर पोहोचली आहे. उल्हासनगरमध्ये नवीन २२६ रुग्णांची तर तिघांच्या मृत्यू झाला. बाधितांची संख्या चार हजार ८४४ तर, मृतांची ७४ आहे. अंबरनाथमध्ये ५५ रुग्णांमुळे बाधितांची संख्या दोन हजार ८२९ झाली आहे. बदलापूरमध्ये ८९ रुग्णांमुळे बाधितांचा आकडा एक हजार ६१३ इतका झाला. याशिवाय, ठाणे ग्रामीण भागात २०४ रुग्णांची तर तिघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या तीन हजार ५८२ तर मृतांची ९६ वर पोहोचली आहे.
नवी मुंबईत ३१८ रुग्ण वाढले
नवी मुंबई : शहरात ३१८ रुग्ण वाढले असून एकूण रुग्णसंख्या १०,२७३ झाली आहे. तर ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, २७८ रुग्ण बरे झाले असून कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ६३५० झाली आहे.
रायगडात ४६३ नवे रु ग्ण
अलिबाग : रायगड जिल्ह्यात बुधवारी ४६३ नव्या रु ग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या ८ हजार ६२८ वर पोहोचली आहे. तर आठ रुग्णांचा मृत्यू झाला.