CoronaVirus News: पोषक अन्नघटक असलेल्या रानभाज्या बाजारात; कोरोना काळात नागरिकांची वाढती पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 02:29 AM2020-06-18T02:29:42+5:302020-06-18T02:29:50+5:30

आदिवासी पाड्यातील ग्रामस्थांना मिळतोय रोजगार

CoronaVirus News: Nutritious legumes in the market | CoronaVirus News: पोषक अन्नघटक असलेल्या रानभाज्या बाजारात; कोरोना काळात नागरिकांची वाढती पसंती

CoronaVirus News: पोषक अन्नघटक असलेल्या रानभाज्या बाजारात; कोरोना काळात नागरिकांची वाढती पसंती

Next

- अनिरुद्ध पाटील 

बोर्डी : रानभाज्यांमध्ये लोह, खनिज, प्रथिने आदी पोषक गुणधर्म असल्याने आहारात त्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या भाज्या खाल्ल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होत असल्याने कोरोनाविरुद्धच्या लढाईत त्यांचे महत्त्व अधोरेखित होत आहे. मान्सूनपूर्व पावसामुळे रानभाज्यांच्या वाढीला पोषक वातावरण तयार झाले असून या भाज्यांची बाजारातील आवक वाढली आहे. नागरिकही या भाज्या मोठ्या प्रमाणावर खरेदी करताना दिसत असून स्थानिक आदिवासी महिलांना चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे.

निसर्ग चक्रीवादळापासून जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने कमी-अधिक स्वरूपात हजेरी लावल्यानंतर येथील जंगल, शिवार आणि मोकळ्या जागांवर विविध प्रकारच्या रानभाज्यांसाठी पोषक वातावरण तयार झाले. स्थानिक पातळीवर उगवणाऱ्या विविध प्रकारच्या या रानभाज्यांचा आकार रंग, फुले इत्यादींमुळे त्या वेल, शेंग आणि फळवर्गीय तसेच कंदमुळे या प्रकारानुसार ओळखण्यात स्थानिकांचा हातखंडा आहे. एवढेच नव्हे तर त्यामध्ये आढळणाºया औषधी गुणधर्मामुळे, त्या कोणत्या आजारांवर रामबाण उपाय ठरू शकतात याचीही त्यांना माहिती आहे. या त्यांच्या ज्ञानाला आहारतज्ज्ञांकडूनही दुजोरा मिळाला असून ठराविक हंगामात जरी त्यांचे सेवन केले तरी त्यामुळे निर्माण होणारी प्रतिकारशक्ती अनेक आजारांवर रामबाण उपाय ठरते.
डहाणू शहरातील बाजारात विविध तालुक्यातील आदिवासी पाड्यांवरून आलेल्या महिला रानभाज्या विकत आहेत. त्याद्वारे त्यांना रोजगार, तर नागरिकांना पौष्टिक आहार मिळत आहे.

लागवडीसाठी प्रयत्न
रानभाज्यांमध्ये औषधी गुणधर्म असल्याने त्यांचे महत्त्व नागरिकांना पटवून देण्यासाठी रानभाज्यांचे प्रदर्शन, पाककृती स्पर्धा यांचे आयोजन केले जाते. शिवाय दुर्मिळ तसेच नामशेष होणाºया या भाज्यांच्या लागवडीसाठी प्रयत्न सुरू आहेत.
- विलास जाधव, प्रमुख शास्त्रज्ञ,
कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड

Web Title: CoronaVirus News: Nutritious legumes in the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.