Coronavirus News: ठाण्याच्या ग्लोबल हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागातील ७४ पैकी २४ बेडच कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 12:04 AM2020-07-10T00:04:57+5:302020-07-10T00:09:47+5:30
ठाण्यातील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये ७४ बेडचे आयसीयू युनिट असून यामध्ये केवळ २४ बेडच कार्यान्वित असल्याची कबूली पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिली. या २४ बेडसाठी एकच डॉक्टर असून लवकरच डॉक्टरांची भरती केली जाणार आहे. रुगांच्या नावांची अदलाबदल होण्याचे प्रकार टाळण्यासाठी यापुढे रुग्णांना दाखल करतांना तीन प्रकारच्या नोंदी केल्या जाणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ग्लोबल हॉस्पिटलमध्ये ७४ बेडचे आयसीयू युनिट असून यामध्ये केवळ २४ बेडच कार्यान्वित असल्याची कबूली पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी गुरुवारी दिली. विशेष म्हणजे या २४ बेडसाठी एकच डॉक्ट असून भरती प्रक्रि या देखिल निरंतर सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ग्लोबल हॉस्पीटलच्या तीन आयसीयूमध्ये डॉक्टर्स होते. मात्र, मात्र एकाची ताब्येत बिघडल्यामुळे ते गेले. तर अन्य एकाला कोरोनाची लागण झाली. त्यामुळे क्वारंटाईन होणे आवश्यक असल्याने या ठिकाणी डॉक्टर्सची कमतरता असल्याचे शर्मा म्हणाले. विशेष म्हणजे या २४ बेडसाठी एकच डॉक्टर्स असून भरती प्रक्रि या ही एकदा झाली असली तरी ती निरंतर सुरूच राहणार आहे. त्यामुळे अधिक क्षमतेने रुग्णालय सुरु करणार असल्याचेही ते म्हणाले.
* रु ग्णांच्या तीन प्रकारच्या नोंदी होणार
ग्लोबल हॉस्पिटलसारखा यापुढे न होण्यासाठी
रु ग्णाला दाखल करतानाच आता तीन प्रकारच्या नोंदी घेतल्या जाणार आहेत. यात त्याचे आधारकार्ड आणि पॅनकार्ड घेऊन त्याची नोंद केली जाईल. त्यानंतर रु ग्णाचे छायाचित्र घेऊन तेही त्याच्या फाईलला लावले जाणार आहे. तसे रुग्णांच्या नातेवाईकांनाही विश्वासात घेतले जाणार आहे.
* दोन्ही कुटूंबांना मिळणार योग्य मृत्यू दाखला
गायकवाड आणि सोनवणे यांच्या अदलाबदल प्रकरणात आपण वैयक्तिक लक्ष घातले असून दोन्ही कुटुंबियांना योग्य मृत्यूचा दाखला दिला जाणार आहे. तशी कार्यवाही सुरु केल्याचेही शर्मा यांनी सांगितले.