CoronaVirus News: 'पालकांनो, लहान मुलांना जपा, कोरोनाचा धोका वाढतोय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 12:22 AM2021-04-07T00:22:50+5:302021-04-07T00:23:03+5:30

CoronaVirus News: वर्षभरात दहा वर्षांखालील ८५२ मुले बाधित : काळजी घेण्याचे आव्हान

CoronaVirus News: 'Parents, take care of children, the risk of corona is increasing! | CoronaVirus News: 'पालकांनो, लहान मुलांना जपा, कोरोनाचा धोका वाढतोय!

CoronaVirus News: 'पालकांनो, लहान मुलांना जपा, कोरोनाचा धोका वाढतोय!

Next

- हितेन नाईक

पालघर :  राज्यात लहान मुलांना कोरोनाने विळख्यात ओढल्याचे प्रमाण वाढत असताना आता पालघर जिल्ह्यातील दहा वर्षांखालील ८५४ बालकांना कोरोनाने आपल्या कवेत ओढले आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसह आपल्या लहान बालकांची काळजी घेण्याचे आव्हान पालकांना पेलावे लागणार आहे.
जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट वेगाने हातपाय पसरू लागली असून, जिल्हा प्रशासनाने ही लाट रोखण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या आहेत. एकीकडे लसीकरण केंद्र वाढवून ४५ आणि त्यावरील वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून, टेस्टिंग, ट्रेकिंग आणि ट्रेसिंगद्वारे बाधित रुग्णांवर तात्काळ उपचाराचे प्रमाणही वाढविण्यात आले आहे.

सध्या जिल्ह्यात एकूण ५३ हजार ६२५ पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झाली असून, एक हजार २४१ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चार हजार ९०९ रुग्ण सध्या कोरोनाबाधित आहेत. 

जिल्ह्यात दररोज मोठ्या संख्येने बाधित रुग्ण आढळून येत असून, वसई-विरारमध्ये कोरोना वाढीची संख्या मोठी चिंताजनक आहे. कोरोनाच्या विळख्यातून एकही तालुका सुटलेला नाही.

मार्च २०२० पासून ते २४ मार्च २०२१ दरम्यानच्या वर्षभरात दहा वर्षांखालील ४५२ मुले, तर ४०० मुली अशी एकंदर ८५२ मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. १० ते २० वयोगटातील ९७८ मुले, तर ७१५ मुली अशी एकूण एक हजार ६९३ बाधित, २१ ते ३० वयोगटातील दोन हजार मुले व एक हजार ५०० मुली अशा एकूण तीन हजार ५०० मुली, ३१ ते ४० वयोगटातील दोन हजार २०० तरुण, तर एक हजार ३५७ तरुणी अशा एकूण तीन हजार ५५७ बाधित, ४० ते ५० वयोगटातील एक हजार ७९९ पुरुष तर एक हजार १०० महिला अशा एकूण दोन हजार ८९९ पुरुष-महिला बाधित होत्या, तर ५१ ते ६० वयोगटातील ज्येष्ठांपैकी एक हजार ४६० पुरुष, तर ८३६ महिला अशा एकूण दोन हजार २९६ ज्येष्ठ बाधित आढळून आले आहेत. 

६१ ते ७० वयोगटातील ६७९ पुरुष तर ४६० महिला असे एकूण एक हजार १३९ बाधित, तर ७१ ते ८० वयोगटातील २६० पुरुष, तर १६५ महिला अशा एकूण ४२५ ज्येष्ठ बाधित झाले आहेत, तर ८० वयोगटातील ५८ पुरुष, तर ४१ महिला असे एकूण ९९ ज्येष्ठ नागरिक कोरोनाबाधित झाल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

एप्रिल महिन्यातील एकूण कोरोना रुग्णांची आकडेवारी
१ एप्रिल-         ३७४
२ एप्रिल-     ५२१
३ एप्रिल-     ५८५
४ एप्रिल-     ६७९
५ एप्रिल-     ६३९
६ एप्रिल-     ७४५

Web Title: CoronaVirus News: 'Parents, take care of children, the risk of corona is increasing!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.