CoronaVirus News: प्रवाशांमुळे कोरोना पसरण्याचा धोका?; अ‍ॅण्टीजेन चाचणीची वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 01:17 AM2020-10-08T01:17:30+5:302020-10-08T01:17:37+5:30

स्थानकात स्टॉल लावण्यास आडकाठी

CoronaVirus News: Passengers at risk of spreading corona | CoronaVirus News: प्रवाशांमुळे कोरोना पसरण्याचा धोका?; अ‍ॅण्टीजेन चाचणीची वानवा

CoronaVirus News: प्रवाशांमुळे कोरोना पसरण्याचा धोका?; अ‍ॅण्टीजेन चाचणीची वानवा

Next

- मुरलीधर भवार

कल्याण : मध्य रेल्वेवरील महत्त्वाचे स्थानक असलेले कल्याण जंक्शन व त्यासमोरील एसटी डेपोच्या परिसरात अ‍ॅण्टीजेन चाचणी होत नाही. त्यामुळे लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधून आलेले प्रवासी या स्थानकात उतरल्यानंतर थेट बाहेर पडून रिक्षा, टॅक्सी, मोटार व बसने कल्याण-डोंबिवली, भिवंडी, अंबरनाथ-बदलापूर, टिटवाळा आदी परिसरांत असल्याने त्यांच्याद्वारे कोरोना पसरण्याचा धोका कायम आहे.

लॉकडाऊनमध्ये आपापल्या गावी गेलेले मजूर पुन्हा मुंबईत परतू लागले आहेत. त्यांच्याबरोबर अन्य प्रवासीही लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधून येत आहेत. या प्रवाशांपैकी कोणी कोरोनाबाधित आहे का, हे तपासण्यासाठी ठाण्याच्या धर्तीवर कल्याण स्थानकात त्यांची अ‍ॅण्टीजेन चाचणी झाली पाहिजे. सर्व आरोग्य केंद्रांत ही चाचणी करणाऱ्या केडीएमसीने स्थानकात तशी सुविधा सुरू केलेली नाही. केडीएमसीने क्रेष्णा डायग्नोस्टीक या संस्थेला कल्याण स्थानकात अ‍ॅण्टीजेन चाचणीचा स्टॉल लावण्याची परवानगी दिली होती. मात्र, स्थानक परिसरात काही जण हा स्टॉल टिकू देत नाहीत. त्यामुळे तो लावलेला नसल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले.

कल्याण एसटी डेपोत पनवेल, नवी मुंबई, मुंबई, अहमदनगर, नाशिक, पुणे आदी भागांत काही प्रमाणात बस सोडल्या जात आहेत. तसेच अन्य ठिकाणांहून बस या डेपोत येतात. खाजगी ट्रॅव्हल्सच्या बसही मोठ्या संख्येने कल्याण-डोंबिवलीत येतात. या बसमधून येणाºया प्रवाशांचीही अ‍ॅण्टीजेन चाचणी झाली पाहिजे. मात्र, तेथेही चाचणीसाठी कोणतीही सुविधा मनपाने सुरू केलेली नाही. डेपो व्यवस्थापनाकडूनही मनपाकडे अशा प्रकारची मागणी केलेली नाही. त्यामुळे बसमधील प्रवाशांकडून कोरोनाचा प्रसार होण्याची भीती आहे.

...तर तत्काळ उपचार शक्य
केडीएमसी सध्या ‘फॅमिली डॉक्टर कोविड फायटर’, ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेतून कोरोना रुग्णांचा शोध घेत आहे. त्याचप्रमाणे कल्याणबरोबर अन्य स्थानके, बस डेपो येथेही अ‍ॅण्टीजेन चाचणी केली पाहिजे, जेणेकरून बाहेरून येणाºया कोरोना रुग्णांवर तत्काळ उपचार करणे शक्य होईल. तसेच त्यांच्यामुळे
होणारा प्रसार थांबेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

Web Title: CoronaVirus News: Passengers at risk of spreading corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.