CoronaVirus News: कायद्याच्या रक्षकांना कोरोनाचा विळखा; आरोपींच्या संपर्कात आल्याचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 12:57 AM2020-06-14T00:57:45+5:302020-06-14T00:57:56+5:30

डहाणूतील १०, तलासरीतील दोन पोलीस बाधित

CoronaVirus News police infected with covid 19 due to accused | CoronaVirus News: कायद्याच्या रक्षकांना कोरोनाचा विळखा; आरोपींच्या संपर्कात आल्याचा फटका

CoronaVirus News: कायद्याच्या रक्षकांना कोरोनाचा विळखा; आरोपींच्या संपर्कात आल्याचा फटका

Next

बोर्डी/पालघर : दोन कोरोनाबाधित आरोपी कैद्यांच्या सान्निध्यात आल्याचा फटका जिल्ह्यातील अनेक पोलिसांना बसला आहे. आतापर्यंत डहाणू तालुक्यात दहा कर्मचारी बाधित झाले आहेत. तलासरीच्या वेवजी येथे राहणाऱ्या पोलीस कर्मचारी आणि त्याच्या पत्नीला लागण होऊन या तालुक्यातही कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आठही तालुक्यात कोरोनाने शिरकाव केल्याचे दिसून येते. दरम्यान, पालघर पोलीस ठाण्यातील १३ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना अलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.

डहाणू तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या पंचेचाळीसवर पोहचली असून त्यापैकी १९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत बाधित रुग्णांमध्ये दहा पोलीस कर्मचाºयांचा समावेश असून ही चिंतेची बाब आहे. डहाणू पोलीस ठाण्यात दोन आरोपींना एका गुन्ह्याखाली अटक केल्यानंतर त्यांच्या संपर्कात येऊन कर्मचाºयांना या आजाराची लागण झाली.

तालुक्यात प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांना प्रवासाचा इतिहास असून त्यांच्या सानिध्यात आल्यामुळे इतरांनाही आजाराची लागण झाली आहे. डहाणू पोलीस ठाण्यात दोन आरोपींच्या सानिध्यात आल्याने कर्मचाºयांना त्याची किंमत मोजावी लागली असून हे कर्मचारी कोरोनाग्रस्त होत असल्याचे दिसते. त्यामुळे पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण आहे. डहाणू गावातील एका हाऊसिंग सोसायटीत राहणाºया युवकाला कोरोनाची लागण झाल्यानंतर हे क्षेत्र प्रतिबंधित घोषित करण्यात आले. या सोसायटीच्या तळमजल्यावर ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा असून ती सील करण्यात आली आहे.
दरम्यान, वसई, पालघर, डहाणू, वाडा, जव्हार, विक्रमड या तालुक्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले होते. तर मोखाडा आणि तलासरीत एकही रुग्ण नसल्याने हे दोन तालुके कोरोनामुक्त होते. आता तेथेही शिरकाव झाल्याने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत या आजाराने हातपाय पसरले आहेत.

‘त्या’ आरोपीच्या संपर्कातील १३ पोलिसांचे अलगीकरण
पालघर : पत्नीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या उमरोळी येथील ४४ वर्षीय आरोपीस कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या पालघर पोलीस ठाण्यातील १३ पोलीस अधिकारी-कर्मचाºयांना अलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.
पालघर तालुक्यातील उमरोळी येथील एका इसमाचे आपल्या पत्नीसोबत नेहमी भांडण होत असे. सततच्या त्रासाला कंटाळून सदर महिलेने आत्महत्या केली होती. पत्नीच्या आत्महत्येस जबाबदार असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्यानंतर पतीला पोलिसांनी अटक करीत त्याला पालघर न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याला १२ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्याच्यात कोरोनासदृश लक्षणे आढळल्याने त्याच्या घशातील नमुने तपासणीसाठी मुंबई येथे पाठविण्यात आले होते. शुक्रवारी पालघर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, त्याला कोरोनाची लागण झाल्यामुळे पालघर पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे. या आरोपीच्या संपर्कात कोण कोण आले आहे याची माहिती घेण्यात आल्यानंतर एका पोलीस उपनिरीक्षकासह १३ कर्मचाºयांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्यांची तपासणी सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी दिली. आरोपी रुग्णाला पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

तलासरीतील पोलीस व पत्नी पॉझिटिव्ह
तलासरी : तलासरी तालुक्यात प्रथमच दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून तलासरी पोलीस ठाण्यातील कर्मचारी व त्याचा पत्नीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाबाधित आरोपीच्या संपर्कातून डहाणूमधील पोलीस कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाली होती. तलासरी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या या पोलीस कर्मचारी ड्युटीनिमित्त डहाणूमधील बाधितांच्या निकट संपर्कात आल्याने कोरोनाची लागण झाल्याची माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.
कोरोना संसर्गित पोलीस कर्मचारी यांचा संपर्कात आलेल्या कुटुंबातील चार जणांना उधवा येथील कोविड केअर सेंटरमध्ये क्वारंटाइन करण्यात आले आहे.

Web Title: CoronaVirus News police infected with covid 19 due to accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.