CoronaVirus News: रस्त्यावरील मास्क धोकादायक; सॅनिटायझरच्या दर्जावरही शंका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 11:28 PM2020-06-15T23:28:33+5:302020-06-15T23:28:55+5:30

अशा विक्रे त्यांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे

CoronaVirus News: Road masks dangerous; Doubts also about the quality of the sanitizer | CoronaVirus News: रस्त्यावरील मास्क धोकादायक; सॅनिटायझरच्या दर्जावरही शंका

CoronaVirus News: रस्त्यावरील मास्क धोकादायक; सॅनिटायझरच्या दर्जावरही शंका

Next

- अरुणकुमार मेहत्रे 

कळंबोली : लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे पनवेल महापालिका क्षेत्रात रस्त्यावर, दुकानात, कार्यालय, बँकेतील वर्दळ वाढली आहे. बाजारपेठेतसुद्धा मोठ्या प्रमाणात नागरिक खरेदीकरिता येत आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारपर्यंत कोरोनामुळे ४२ जणांचा मृत्यू झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यामुळे आरोग्य विभागाची जबाबदारी वाढली आहे. रस्त्याच्या कडेला, सिग्नलवर स्वस्तात मास्क व सॅनिटायझरची विक्री केली जाते. या वस्तू आरोग्याच्या दृष्टीने किती योग्यतेच्या आहेत, हे पाहणे तितकेच गरजेचे झाले आहे.

पनवेल परिसरातील रस्त्याच्या कडेला, चौकात, हातगाड्यांवर मास्क, सॅनिटायझरची विक्री केली जात आहे. ३० रुपयांपासून ते १०० रुपयांपर्यंत रंगीबेरंगी मास्क विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. त्याचबरोबर सॅनिटायझरच्या छोट्या बॉटलचीही विक्री केली जात आहे. मुंबई-पुणे महामार्ग तसेच अंतर्गत रस्ते, चौकातील सिग्नलवर मास्कचे फिरस्ती हातठेले पाहायला मिळत आहेत. उल्हासनगर, मुंबई येथून हे मास्क खरेदी करून पनवेल परिसरात रस्त्यावर विक्री केली जात आहे. रस्त्याच्या कडेला असलेले रंगीबेरंगी फॅन्सी मास्क नागरिकांना आकर्षित करतात. घेण्याकरता नागरिकांकडून प्रत्येक मास्कला स्पर्श केला जातो. त्याचबरोबर तोंडालाही लावून पाहिले जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. कोरोना विकत घेण्यासारखे झाले आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. स्वस्तातील मास्क मिळतात म्हणून त्याचा वापर करणे धोकादायक ठरू शकते. पॅकबंद असलेले मास्क तसेच घरी तयार केलेल्या मास्कचा वापर करायला हवा. दर्जाहीन तसेच स्पर्श झालेल्या मास्कची विक्री केल्याने कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. लहान मुले, वृद्ध व्यक्तींना असे उत्पादन केलेले मास्क वापरणे धोकादायक ठरू शकते.

विक्रेत्यांसाठी नियमावली गरजेची
रस्त्यावर विक्री करणारे हे सामान्य कुटुंबातील तसेच परप्रांतीय आहेत. मास्क खरेदीमुळे त्यांना दोन पैशांची मदत होणार आहे. मात्र मास्क उघड्यावर विकण्याऐवजी पाकिटात बंद असलेले मास्क तसेच योग्य काळजी घेऊन विक्री करण्याकरता महापालिकेने नियमावली तयार करणे गरजेचे आहे. पॉकीट बंद असल्याने स्पर्श टाळता येऊ शकतो. यामुळे रोजगारही मिळेल आणि नागरिकांना योग्य दर्जाचे मास्कही उपलब्ध होतील. यासाठी महापालिकेने पुढाकार घेणे आवश्यक आहे.

Web Title: CoronaVirus News: Road masks dangerous; Doubts also about the quality of the sanitizer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.