CoronaVirus News: ठाण्यात सोडियम हायपोक्लोराईडची 37 पथकांद्वारे फवारणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 04:20 PM2020-06-28T16:20:30+5:302020-06-28T16:20:39+5:30

ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाची आठ शीघ्र कृती वाहने , 13 ट्रॅक्टर्स तसेच बोलेरो जीप आदी वाहनांचा वापर करण्यात येत आहे.

CoronaVirus News: Sodium hypochloride sprayed by 37 teams in Thane | CoronaVirus News: ठाण्यात सोडियम हायपोक्लोराईडची 37 पथकांद्वारे फवारणी

CoronaVirus News: ठाण्यात सोडियम हायपोक्लोराईडची 37 पथकांद्वारे फवारणी

Next

ठाणे: कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी ठाणो शहरात सोडियम हायपोक्लोराईडच्या फवारणीची मोहीम युद्धपातळीवर सुरु करण्यात आली आहे. यासंदर्भात पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्यासह बहुतांश पदाधिका:यांकडून फवारणी अधिक तीव्र करण्याबाबतच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या होत्या. त्याच पाश्र्वभूमीवर 37 पथकांच्या सहाय्याने ही फवारणी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रंनी दिली.

सद्य:स्थितीत सर्वच प्रभाग समितीमध्ये सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी सुरू असून ही मोहीम आता अधिक व्यापक करण्याचे आदेश महापालिका आयुक्त शर्मा यांनी दिल्या आहेत.

या मोहिमेंतर्गत रविवारी आनंदनगर, कोपरी, काजूवाडी, चरई, सिद्धेश्वर तलाव, किसननगर, सी पी तलाव, लोकमान्यनगर, गोकुळदासवाडी आदी ठिकाणी फवारणी सुरू करण्यात आली. त्याचबरोबर सकाळी कादर पॅलेस, शमशाद नगर, इंशा नगर, अमृत नगर या कंटेनमेंट झोन परिसरातही फवारणी करण्यात आली.

या मोहिमेसाठी ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाची आठ शीघ्र कृती वाहने , 13 ट्रॅक्टर्स तसेच बोलेरो जीप आदी वाहनांचा वापर करण्यात येत आहे. यामध्ये प्रमुख रस्ते, प्रतिबंधित क्षेत्र, हॉटस्पॉटबरोबरच  संपूर्ण शहरामध्ये ही फवारणी केली जाणार आहे. यावेळी उपआयुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले आणि आरोग्य अधिकारी डॉ. हळदेकर आदी उपस्थित होते.

Web Title: CoronaVirus News: Sodium hypochloride sprayed by 37 teams in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.