CoronaVirus News : फक्त महिलांसाठी स्वतंत्र क्वारंटाईन सेंटर सुरू करा, मनसेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 01:24 PM2020-07-24T13:24:03+5:302020-07-24T13:26:44+5:30

पाटीदार भवन ह्या तीन मजली सभागृहाच्या इमारतीमध्ये तीनही मजल्यांवर प्रत्येकी ७o ऑक्सिजनची सेवा असलेले  बेड्स असे एकूण २१o ऑक्सिजन बेडच्या रूग्णालयाचे काम पूर्णत्वास आले असून येत्या दोन दिवसात सुरू होण्याची आशा आहे.

CoronaVirus News: Start separate quarantine center for women only, MNS demands | CoronaVirus News : फक्त महिलांसाठी स्वतंत्र क्वारंटाईन सेंटर सुरू करा, मनसेची मागणी

CoronaVirus News : फक्त महिलांसाठी स्वतंत्र क्वारंटाईन सेंटर सुरू करा, मनसेची मागणी

Next
ठळक मुद्देरूग्णालयाचे काम करून उत्तमरित्या ते उभारण्यात आल्यामुळे आमदार राजू पाटील यांनी त्यावर मेहनत घेणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांचे कौतुक केले.

कल्याण : फक्त महिलांसाठी स्वतंत्र विलगीकरण केंद्र (क्वारंटाईन केंद्र) सुरू करण्यात यावे. जोपर्यंत जिमखाना कोविड रूग्णालय सुरू होत नाही, तोपर्यंत शास्त्रीनगर रुग्णालयातील व्हेंटिलेटर वाढवा, अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. शुक्रवारी मनसे आमदार पाटील यांनी डोंबिवली येथील तात्पुरत्या स्वरूपात नव्याने उभारल्या जाणाऱ्या कोविड रूग्णालयाचे काम सुरू असलेल्या जिमखाना मैदान व पाटीदार भवन हॉल या दोन ठिकाणी महापालिका अधिकाऱ्यांसह भेट देऊन पाहणी केली.

पाटीदार भवन सभागृहांतील रूग्णालयाचे काम हे संपलेले असून लवकरच म्हणजे येत्या दोन तीन दिवसात सुरू होणार आहे. परंतु डोंबिवली जिमखाना येथील काम पूर्ण होण्यास अद्याप १५-२o दिवसांचा अवधी दिसून येतो. त्यामुळे येथील चार पाच व्हेंटिलेटर हे शक्य असल्यास तात्पुरत्या स्वरूपात शास्त्रीनगर रूग्णालयात सुरू व्हावे, अशी मागणी ते केडीएमसी आयुक्तांकडे करणार आहेत, जेणेकरुन व्हेंटिलेलेटरची गरज असलेल्या रूग्णांची परवड होणार नाही.

सध्या कोरोना रूग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे, तसेच बरेच रूग्णांना ऑक्सिजन बेड्सची कमतरता भासत आहे, त्यासाठी ३o व्हेंटिलेटर व ७o ऑक्सिजनची सुविधा असलेल्या बेड्ससह १७o बेड्सचे तात्पुरते कोविड रूग्णालय डोंबिवली जिमखाना मैदानावर सुरू होत आहे, ह्या रूग्णालयात डायलॅसिसची सुविधा असलेल्या तीन अद्ययावत बेड्सची विशेष सेवा देखिल उपलब्ध होणार आहे, ही सेवा सध्या संपूर्ण ठाणे जिल्ह्यात फार कमी प्रमाणात उपलब्ध आहे, त्यामुळे किडणी विकार असलेल्या व डायलॅसिसची गरज असलेल्या कोरोना रूग्णांची परवड थांबणार आहे,

पाटीदार भवन ह्या तीन मजली सभागृहाच्या इमारतीमध्ये तीनही मजल्यांवर प्रत्येकी ७o ऑक्सिजनची सेवा असलेले  बेड्स असे एकूण २१o ऑक्सिजन बेडच्या रूग्णालयाचे काम पूर्णत्वास आले असून येत्या दोन दिवसात सुरू होण्याची आशा आहे. एका इमारतीत फक्त १५ दिवसात व कमी खर्चात ह्या रूग्णालयाचे काम करून उत्तमरित्या ते उभारण्यात आल्यामुळे आमदार राजू पाटील यांनी त्यावर मेहनत घेणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांचे कौतुक केले. तसेच पाटीदार भवनाची संपूर्ण व सुसज्ज इमारत उपलब्ध करून देणाऱ्या पाटीदार समाज्याच्या ह्या सेवाभावी कार्यांचे विशेष आभार लवकरच एक आभार पत्र देऊन मानले जातील, असे आमदार राजू पाटील यांनी सांगितले.

दोन्ही रूग्णालयांच्या पाहणीनंतर लवकरच महापालिका आयुक्त यांची भेट घेऊन फक्त महिलांसाठी स्वतंत्र विलगीकरण केंद्र (क्वारंटाईन केंद्र) सुरू व्हावे. जोपर्यंत जिमखाना कोविड रूग्णालय सुरू होत नाही, तोपर्यंत शास्त्रीनगर रुग्णालयातील व्हेंटिलेटर वाढवावे, अशी मागणी करण्यात येणार असल्याचे सांगितले.

आणखी बातम्या...

CoronaVirus News : कोरोनावरील इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या महिलेला अटक    

इराणच्या पॅसेंजर विमानाजवळ आली दोन अमेरिकन लढाऊ विमाने, थोडक्यात मोठा अपघात टळला

राजस्थानच्या राजकारणातला आजचा दिवस महत्वाचा; सचिन पायलट यांच्यासह 18 आमदारांच्या याचिकेवर निर्णयाची शक्यता

"छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला असता तर तिथेच राजीनामा दिला असता"

"छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही, याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे?"

बापरे! पत्नीचे 14 जणांसोबत शारीरिक संबंध; पतीने पाठवली सर्वांना कायदेशीर नोटीस अन्... 

मृत्यूनंतरही आठ लोकांसाठी ठरला फरिश्ता; २७ वर्षीय तरुणाचे अवयवदान

Web Title: CoronaVirus News: Start separate quarantine center for women only, MNS demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.