CoronaVirus News in Thane : पोलीस आयुक्त कार्यालयातील एसीपींसह १४ पोलीस कोरोनाबाधित

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 03:38 AM2020-05-20T03:38:26+5:302020-05-20T03:39:10+5:30

CoronaVirus News in Marathi and Live Updates : मुंब्रा पोलीस ठाण्यात नियुक्तीवर असलेल्या एका पोलीस कर्मचाºयाला रविवारी रात्री कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांना मुंब्रा येथूनच एका खासगी रुग्णालयात दाखल केलेआहे.

CoronaVirus News in Thane: 14 corona infected with ACPs in Police Commissioner's Office | CoronaVirus News in Thane : पोलीस आयुक्त कार्यालयातील एसीपींसह १४ पोलीस कोरोनाबाधित

CoronaVirus News in Thane : पोलीस आयुक्त कार्यालयातील एसीपींसह १४ पोलीस कोरोनाबाधित

Next

ठाणे : मुंब्रा पोलीस ठाण्याच्या आणखी एका कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे वर्तकनगर येथील पोलीस अधिकारी वसाहतीमधील दोनपैकी एक इमारत ठाणे महापालिकेने सोमवारी सील केली आहे. तर पोलीस आयुक्त कार्यालयातील एका साहाय्यक आयुक्तांसह (एसीपी) १४ पोलिसांना लागण झाली असून नियंत्रण कक्षातील महिला अधिकाºयाने कोरोनावर मात केली आहे.
मुंब्रा पोलीस ठाण्यात नियुक्तीवर असलेल्या एका पोलीस कर्मचाºयाला रविवारी रात्री कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांना मुंब्रा येथूनच एका खासगी रुग्णालयात दाखल केले
आहे. ते वास्तव्याला असलेल्या ठाण्यातील वर्तकनगर पोलीस अधिकारी वसाहतीमधील दोनपैकी एक इमारत ठाणे पालिकेने सोमवारी सकाळी ‘सील’ केली. या इमारतीमधील सर्व १८ कुटूंबीयांना होम क्वॉरंटाईन केले आहे. या वसाहतीमध्ये प्रथमच कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे पोलीस अधिकारी तसेच त्यांच्या कुटूंबीयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पोलीस आयुक्त कार्यालयातील एका सहाय्यक पोलीस आयुक्तांसह आतापर्यंत १४ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये नियंत्रण कक्षातील दहा आणि विशेष शाखेतील एकाचा समावेश आहे. याशिवाय, वागळे इस्टेट आणि ठाणोनगर या पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एका कर्मचाºयाचाही अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आला. नियंत्रण कक्षामध्ये गेल्या तीन दिवसांत सहा पोलिसांना लागण झाली आहे. त्यामुळे येथील बाधितांची संख्या ही दहावर पोहचली आहे.

पोलीस कुटुंबाची कोरोनावर मात
ठाणे शहर पोलीस नियंत्रण कक्षातील महिला उपनिरीक्षक आणि तिचा मुंबईतील उपनिरीक्षक पती, सासू आणि दोन वर्षांची मुलगी हे सर्व कुटुंब आता कोरोनामुक्त झाले आहे. त्यामुळे नियंत्रण कक्षातील दहापैकी नऊ जणांवर आता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच विशेष शाखेतील कर्मचाºयानेही कोरोनावर मात केल्यामुळे त्यालाही आता रुग्णालयातून घरी सोडल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठाणे पोलीस नियंत्रण कक्षातील दहा पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. हे खरे आहे. त्यामुळेच खबरदारी म्हणून या कक्षातील कर्मचाºयांचे संख्याबळ हे निम्म्यावर आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणेच आयुक्त कार्यालयातील चारही मजल्यांवरील विविध कार्यालयांतील संख्याबळही ५० टक्के केले आहे.
- विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, ठाणे

Web Title: CoronaVirus News in Thane: 14 corona infected with ACPs in Police Commissioner's Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.