CoronaVirus News in Thane : ठाणे जिल्ह्यात २४४ रुग्णांची नोंद, तर ७ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 12:34 AM2020-05-19T00:34:28+5:302020-05-19T00:35:00+5:30

CoronaVirus News in Marathi and Live Updates : ठाणे महापालिका क्षेत्रात सर्वाधिक ९१ कोरोनाबाधितांची नोंद झाल्याने बाधितांचा आकडा एक हजार १२६९ वर पोहोचला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ७४ बाधितांच्या नोंदीसह सहा जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

CoronaVirus News in Thane: 244 patients registered in Thane district, 7 died | CoronaVirus News in Thane : ठाणे जिल्ह्यात २४४ रुग्णांची नोंद, तर ७ जणांचा मृत्यू

CoronaVirus News in Thane : ठाणे जिल्ह्यात २४४ रुग्णांची नोंद, तर ७ जणांचा मृत्यू

Next

ठाणे : ठाणे जिल्ह्यात सोमवारी एकाच दिवशी २४४ बाधितांसह सात जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा तीन हजार ९२८ झाला असून मृतांचा ११९ वर पोहोचला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात सर्वाधिक ९१ कोरोनाबाधितांची नोंद झाल्याने बाधितांचा आकडा एक हजार १२६९ वर पोहोचला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ७४ बाधितांच्या नोंदीसह सहा जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे तेथील बाधितांचा आकडा १२६४ झाला असून मृतांचा आकडा ३७ वर गेला आहे.
तर, कल्याण डोंबिवलीत ३० रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बाधितांचा संख्या ५३० इतकी झाली उल्हानगरमध्ये सात रुग्णांची नोंद करण्यात आली असून बाधीतांचा आकडा १२६ झाला. तसेच मीरा भार्इंदरमध्ये २९ नव्या रुग्णांची नोंद झाली असून एकाच्या मृत्यू झाला आहे. त्यामुळे बाधितांचा आकडा ३५९ तर मृतांची संख्या ११ झाली आहे. भिवंडी महापालिका क्षेत्रात एका नवीन रुग्णांची नोंद झाल्याने बाधितांचा आकडा ४३ झाला आहे.

ठाणे ग्रामीणमध्ये ८ नव्या बाधितांची नोंद
बदलापूरमध्ये २ रुग्णांची नोंद झाल्याने बाधितांचा आकडा ११६ झाला. तसेच अंबरनाथमध्ये दोन नवीन रुग्णांमुळे बाधितांचा आकडा ३६ वर गेला. ठाणे ग्रामीणमध्ये ८ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने बाधितांचा आकडा १८५ वर गेला.

Web Title: CoronaVirus News in Thane: 244 patients registered in Thane district, 7 died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.