CoronaVirus News in Thane : शासकीय रुग्णालयात झोपडपट्टीतील रुग्णांची परवड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 11:45 PM2020-05-20T23:45:24+5:302020-05-20T23:45:54+5:30

CoronaVirus News in Marathi and Live Updates : शहरातील एकाच खाजगी रुग्णालयात सध्या अशा रुग्णांना घेतले जात आहे. परंतु, सर्वसामान्यांना त्या ठिकाणी पैशांअभावी जाता येणे शक्य नसल्याने त्यांचे हाल सुरूझाले आहेत.

CoronaVirus News in Thane: Affordability of slum patients in government hospitals | CoronaVirus News in Thane : शासकीय रुग्णालयात झोपडपट्टीतील रुग्णांची परवड

CoronaVirus News in Thane : शासकीय रुग्णालयात झोपडपट्टीतील रुग्णांची परवड

googlenewsNext

- अजित मांडके ।

ठाणे : ठाण्यात कोरोनाबाधितांसह आता झोपडपट्टीतील इतर आजारांच्या रुग्णांचेदेखील हाल होत आहेत. श्रीमंतवर्गाला खाजगी रुग्णालयात जाऊन उपचार घेणे शक्य होत आहे. मात्र, साधा ताप आला तरी सामान्यांना महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून घेतले जात नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. शहरातील एकाच खाजगी रुग्णालयात सध्या अशा रुग्णांना घेतले जात आहे. परंतु, सर्वसामान्यांना त्या ठिकाणी पैशांअभावी जाता येणे शक्य नसल्याने त्यांचे हाल सुरूझाले आहेत. यातूनच, शहरात आठवडाभरात दोघांचे मृत्यूही ओढवल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
शहरात आजघडीला १३०० च्या पार कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महापालिकेने आरक्षित केलेल्या रुग्णालयातील खाटांची क्षमताही संपुष्टात येऊ लागली आहे. दुसरीकडे आता झोपडपट्टी भागात तापाचे रुग्णही वाढताना दिसत आहेत. येथील रुग्णाला यासाठी एकतर महापालिकेचे कळवा रुग्णालय किंवा जिल्हा शासकीय रुग्णालय हे दोनच पर्याय शिल्लक आहेत. परंतु, त्या ठिकाणी तपासणीसाठी गेले असता, पहिला तुमचा कोरोनाचा रिपोर्ट आणा, मगच तुम्हाला दाखल करू घेऊ, असे उत्तर दिले जात आहे. त्यामुळे नाइलाजाने ते न तपासता घरी येत आहेत. भीती म्हणा किंवा कामधंदा बंद असल्याने उत्पन्नाचे साधन नसल्याने त्यांना महागडी कोरोना टेस्ट करणेही शक्य होत नाही. त्यामुळे हे आजारपण घरीच काढले जात आहे. एखाद्याची प्रकृती जास्तीच खालावली, तर त्याला अखेर रुग्णालयात हलविले जात आहे. परंतु, तोपर्यंत तो अनेकांच्या संपर्कात येऊन इतरांनादेखील त्याची बाधा होऊन झोपडपट्टीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
यातूनच मागील आठवड्यात वागळे इस्टेट भागातील एका ६० वर्षीय व्यक्तीला ताप येत होता. त्यामुळे त्याने कळवा रुग्णालयात धाव घेतली. परंतु, त्याठिकाणची गर्दी पाहून आणि तेथे दाखल करून घेतले जात नसल्याने त्याने घरचा रस्ता निवडला. आपल्याला कोरोना तर झाला नाही ना? या भीतीपोटी त्याने आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलल्याचे यातूनच समोर आले.
मंगळवारी असाच प्रकार ठाण्यातील वागळे इस्टेटच्या शिवाजीनगरमध्ये घडला असून तापाच्या रुग्णाला दाखल करून न घेतल्याने अखेर त्याचा रस्त्यावर तडफडून मृत्यू झाल्याची घटना घडली.

झोपडपट्टीतील तापाच्या रुग्णांसाठी विशेष व्यवस्था करावी, अशी मागणी मी महापौर म्हणून मागील १५ दिवसा ंपासून प्रशासनाकडे करीत आहे. मात्र, त्याबाबत अद्यापही ठोस पाऊल उचलले नाही. त्यामुळे तेथे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन यावर ठोस उपाययोजना करावी.
- नरेश म्हस्के,
महापौर, ठाणे

Web Title: CoronaVirus News in Thane: Affordability of slum patients in government hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.