CoronaVirus News in Thane : ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांनी ओलांडला चार हजारांचा टप्पा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 03:34 AM2020-05-20T03:34:03+5:302020-05-20T03:34:44+5:30
CoronaVirus News in Marathi and Live Updates : मंगळवारी सापडलेल्या २४९ नव्या रुग्णांमध्ये ठामपा क्षेत्रात सर्वाधिक ८४ रुग्ण मिळून आल्याने येथील रुग्ण संख्या ही एक हजार ३५३ वर गेली आहे.
ठाणे : जिल्ह्यात मंगळवारी नव्याने २४९ कोरोनाबाधितांची नोंद झाल्याने जिल्ह्यातील रुग्णसंख्येने चार हजारचा टप्पा ओलांडला असून रुग्णसंख्या चार हजार १६९ इतकी झाली आहेत.
त्यातच चार जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १२८ वर गेला आहे. नव्याने १९ रुग्ण सापडल्याने ठाणे ग्रामीणने दोनशेचा आकडा पार केल्याची माहिती ठाणे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली. ग्रामीणमध्ये एकाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ४ झाली आहे.
मंगळवारी सापडलेल्या २४९ नव्या रुग्णांमध्ये ठामपा क्षेत्रात सर्वाधिक ८४ रुग्ण मिळून आल्याने येथील रुग्ण संख्या ही एक हजार ३५३ वर गेली आहे. त्यापाठोपाठ नवी मुंबईत ५७ रुग्ण सापडले असून तेथील रुग्ण संख्याही एक हजार ३२१ इतकी झाली आहे. नवी मुंबई दोघांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ३९ वर गेला आहे. कल्याण डोंबिवलीत सापडलेल्या नव्या ३८ रुग्णांमुळे तेथील रुग्ण संख्या ही ५६८ इतकी झाली आहे. त्यातच एक जण दगावला असून मृतांची संख्या १२ झाली आहे. मीरा भार्इंदरला २५ रुग्णांची नोंद झाल्याने तेथील रुग्ण संख्या ३७६ झाली आहे. उल्हासनगर येथे १२ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने एकूण रुग्ण संख्या १३८ झाली आहे. अंबरनाथला १० रुग्णांचे निदान झाल्याने रुग्ण संख्या ४६ झाली आहे.
बदलापूरला ३ रुग्ण मिळाल्याने तेथील रुग्ण संख्या ११९ झाली आहे. तर सर्वात कमी म्हणजे अवघा एकच रुग्ण हा भिवंडीत आढळून आल्याने तेथील रुग्ण संख्या ही ४४ झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.