Coronavirus News: लॉकडाऊन काळात समाजकार्य करणाऱ्यांचा ठाणे पोलिसांनी सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 11:15 PM2020-09-17T23:15:34+5:302020-09-17T23:22:37+5:30
लॉकडाऊनच्या काळात बंदोबस्तावरील पोलिसांना सर्व प्रकारची मदत करणा-या तसेच गर्दी नियंत्रणासाठी पुढाकार घेणा-या सामाजिक संस्थांसह सामाजिक कार्यकर्ते आणि पोलीस मित्रांचा परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांच्या हस्ते बुधवारी सत्कार करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कोरोनाचा सामना करण्यासाठी तसेच त्यावर नियंत्रण आणण्यासाठी ठाणे शहरात गेली सहा महिने लॉकडाऊन करण्यात आले होते. या काळात बंदोबस्तावरील पोलिसांना सर्व प्रकारची मदत करणाºया तसेच गर्दी नियंत्रणासाठी पुढाकार घेणाºया सामाजिक संस्थांसह सामाजिक कार्यकर्ते आणि पोलीस मित्रांचा परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांच्या हस्ते बुधवारी सत्कार करण्यात आला.
कोरोना महामारीने जगात थैमान घातले असतांनाच ठाण्यातील अनेक सामाजिक संस्थांनी गरीब, गरजू व्यक्तींना अन्नदान करण्यासाठी पुढाकार घेतला. पोलिसांनाही अल्पोहाराबरोबरच आयुर्वेदिक काढेही काहींनी पुरविले. तर काहींनी थेट पोलिसांच्या बरोबरीने सोशल डिस्टसिंगच्या नियमांचे पालन करण्यासाठी नागरिकांना समुपदेशन केले. तर काहींनी गर्दी नियंत्रणासाठी आवाहन केले. त्यामुळे अपुºया संख्येतही ठाणेनगर पोलिसांना कोरोनाचा सामना करण्यासाठी मोठे बळ मिळाले. कोविड योद्धे पोलिसांबरोबरच डॉक्टर, परिचारिका, सफाई कर्मचारी आदींनाही शक्य होईल तशी मदत सामाजिक संघटनांनी मदत केली. अशाच संघटनांच्या तसेच व्यक्तींच्या कार्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाजनवाडी सभागृहात १६ सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या छोटेखानी कार्यक्रमात ठाणेनगर पोलिसांनी सत्कार केला. यामध्ये ठाण्यातील ॠंषभजी महाजन जैन मंदिर ट्रस्ट , श्री ठाणा हलाई लोहाना महाजन ट्रस्ट , हलाई लोहाना फाऊंडेशन, एनकेटी चॅरीटेबल ट्रस्ट, ईज आयनेज प्रिन्स आगा खान शिया ईस्माइली जमान खाना, महागिरी वेल्फेअर कमिटी, संपत चोप्रा, भरत, पुनमिया, प्रविण राठोड, सुरेश छाजड, श्री ठाणा हलाई लोहाना महाजन ट्रस्ट , हलाई लोहाना फाऊंडेशन केतन ठक्कर, जितेंद्र बुराडे, जयंत मगनलाल गणात्रा, नानजी ठक्कर ठाणावाला, जितेंद्र नानजी ठक्कर आदींचा यामध्ये समावेश होता. गेल्या सहा महिन्यांपासून या संस्थांनी अन्न, पाणी आणि औषधांचेही वाटप केले. पोलीस मित्रांनीही पहाटे ४ वाजल्यापासून बंदोबस्तात सहकार्य केले होते. या सर्वांचा उपायुक्त बुरसे, सहायक पोलीस आयुक्त नीता पाडवी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम सूर्यवंशी आणि निरीक्षक विजय देशमुख आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.