CoronaVirus News in Thane : ठाणेकरांची चिंता वाढणार, शहरात अवघे २० टक्केच बेड शिल्लक!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 04:27 PM2021-04-07T16:27:15+5:302021-04-07T16:27:52+5:30

CoronaVirus News in Thane : महापालिका हद्दीत सध्या १२ हजार ९८३ रुग्ण प्रत्यक्ष उपचार घेत असून त्यातील ८० टक्के रुग्ण घरी उपचार घेत असले तरी देखील रुग्णालयातील ८० टक्के बेड फुल झाल्याची माहिती समोर आली आहे.

CoronaVirus News in Thane : Thanekar's anxiety will increase, only 20% beds are left in the city! | CoronaVirus News in Thane : ठाणेकरांची चिंता वाढणार, शहरात अवघे २० टक्केच बेड शिल्लक!

CoronaVirus News in Thane : ठाणेकरांची चिंता वाढणार, शहरात अवघे २० टक्केच बेड शिल्लक!

Next

ठाणे  : कोरोना रोखण्यासाठी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून विविध स्वरुपाच्या उपाय योजना केल्या जात आहेत. परंतु मागील काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या चार ते पाच पटीने वाढतांना दिसत आहे. त्यामुळे शहरातील कोव्हिड सेंटरमध्ये आता बेडची संख्या देखील कमी होऊ लागली आहे. महापालिका हद्दीत सध्या १२ हजार ९८३ रुग्ण प्रत्यक्ष उपचार घेत असून त्यातील ८० टक्के रुग्ण घरी उपचार घेत असले तरी देखील रुग्णालयातील ८० टक्के बेड फुल झाल्याची माहिती समोर आली आहे. तर खाजगी रुग्णालयातील बेड मिळविण्यासाठी रुग्णांच्या कुटुबीयांची तारेवरची कसरत सुरु झाली आहे. त्यातही आता जोखमीच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने आयसीयुचे बेड देखील फुल्ल झाले असून सध्या ८ टक्केच बेड शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे.

महापालिका हद्दीत मागील काही दिवसापासून कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. आता ठाण्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानुसार याचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्नणा सज्ज झाली असून विविध उपाय योजना हाती घेण्यात येत आहेत. सध्या रोजच्या रोज १५०० ते १८०० रु ग्ण आढळत आहेत. त्यामुळे रुग्णांचा आकडा वाढतांना दिसत आहे. दरम्यान, सध्या प्रत्यक्षात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १२ हजार ९८३ एवढी आहे. यातील ३ हजार २९४ रुग्ण हे शहरातील विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.  तर यातील ९२८१ रुग्ण हे घरीच विलीगकरणात आहेत. दरम्यान, एकूण रुग्णातील ९ हजार ७४६ रुग्णांना कोणतीही लक्षणे दिसून आलेली नाहीत. तर २ हजार ७०९ रुग्णांमध्ये सौम्य लक्षण आढळून आली आहेत. ५२८ रुग्ण हे अत्यवस्थ आहेत. तर ५२८ रुग्ण हे आयसीयुमध्ये उपचार घेत आहेत. तर ५७ रुग्ण हे व्हेटिंलेटरवर आहेत. त्यामुळे एकूण ४ हजार १२२ बेड पैकी ३ हजार २९४ बेड फुल्ल झाले असून केवळ ८२८ बेड विविध रुग्णालयात उपलब्ध असल्याची माहिती समोर आली आहे.

त्यानुसार शहरात सध्याच्या घडीला केवळ २० टक्केच बेड शिल्लक असल्याचे दिसून येत आहे. त्यातही महापालिकेच्या ग्लोबल कोवीड सेंटरमधील बेडही आता फुल झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पालिकेला आता ज्युपीटर येथील दुसऱ्या कोव्हिड सेंटरकडे मोर्चा वळवावा लागला आहे. याठिकाणी देखील ४०० हून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत.  त्यातही जनरलचे ११९४ बेड पैकी ६३९ बेड फुल असून त्यातील ५५५ बेड शिल्लक आहेत. तर ऑक्सिजनचे २ हजार ३५७ बेड पैकी २०७० बेड फुल असून २८७ बेड शिल्लक आहेत. याचाच अर्थ ऑक्सिजनचे १२ टक्केच बेड शिल्लक असल्याचे दिसत आहे. तर आयसीयुचे ५७१ पैकी ५२८ बेड फुल असून आता केवळ ८ टक्केच बेड शिल्लक आहेत. व्हेटिंलेटरचे २२६ पैकी ५७ बेड फुल असून १६९ बेड शिल्लक असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, महापालिकेच्या माध्यमातून २५०० बेडची नवीन व्यवस्था करण्यात येत असली तरी तोर्पयत रुग्णांना बेड मिळविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. खाजगी रुग्णालयात तर बेड मिळावा यासाठी रुग्णांच्या नातेवाईंकाचे शर्तीचे प्रयत्न असतात. परंतु खाजगी रुग्णालयाचे बेड देखील मिळणो कठीण झाले आहे. दुसरीकडे ठाणो जिल्हा शासकीय रुग्णालयातील बेड देखील १०० टक्के फुल्ल झाल्याने रुग्णांना बेड मिळविण्यासाठी आता तारेवरची कसरत सुरु झाली आहे. त्यातही रुग्णांचा आकडा हा दिवसागिणक वाढत असल्याने दोन दिवसात शिल्लक बेडही फुल होतील असे सांगितले जात आहे. त्यानंतर मात्र काय असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

Web Title: CoronaVirus News in Thane : Thanekar's anxiety will increase, only 20% beds are left in the city!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.