Coronavirus News: ठाण्यातील दोन नगरसेवक कोरोना पॉझिटिव्ह; बेड मिळवण्यासाठी तारेवरची कसरत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 03:58 PM2020-05-27T15:58:47+5:302020-05-27T16:00:16+5:30

Coronavirus News in Marathi: आतापर्यंत शहरात तीन नगरसेवकांना कोरोनाची बाधा झाली असून एका महिला नगरसेविकेने यावर मात केली आहे.

Coronavirus News in Thane: Two corporators in Thane Covid 19 Positive | Coronavirus News: ठाण्यातील दोन नगरसेवक कोरोना पॉझिटिव्ह; बेड मिळवण्यासाठी तारेवरची कसरत

Coronavirus News: ठाण्यातील दोन नगरसेवक कोरोना पॉझिटिव्ह; बेड मिळवण्यासाठी तारेवरची कसरत

Next
ठळक मुद्देदोन नगरसेवकांनी कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.कळव्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक हे कोरोना योद्धा म्हणून आपली भूमिका पार पाडत होते.दोघांनाही रुग्णालयात बेड मिळविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली.

ठाणे: ठाणे शहरात कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे, यामध्ये आमदार, मंत्री पाठोपाठ आता ठाण्यातील आणखी दोन नगरसेवकांनी कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या दोघांनाही रुग्णालयात बेड मिळविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागल्याची माहितीही समोर आली आहे. एकासाठी थेट वरिष्ठ पातळीवरील नेत्याने कॉल केला तेव्हा बेड मिळाला. दुसऱ्या नगरसेवकाला ठाण्यातून, मुलुंड आणि तेथेही बेड नसल्याने थेट मुंबईतील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तेथेही शेअरींगमध्ये बेड मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली. आतापर्यंत शहरात तीन नगरसेवकांना कोरोनाची बाधा झाली असून एका महिला नगरसेविकेने यावर मात केली आहे.

ठाणे शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज शहरात कोरोनाचा आकडा 2 हजाराच्या पार गेला आहे. यातून मंत्री, आमदार देखील सुटू शकलेले नाहीत. आता महापालिकेच्या नगरसेवकांनाही कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. ठाण्यातील कोपरी भागातील भाजपचे नगरसेवक आणि कळव्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक या दोघांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. कळव्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक हे कोरोना योद्धा म्हणून आपली भूमिका पार पाडत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्या कुटुंबीयांना रात्रभर शहरातील विविध रुग्णालयात बेडसाठी झगडावे लागले. त्यानंतर सकाळी एका वरिष्ठ नेत्याने मुंबईहून फोन केल्यानंतर त्यांना घोडबंदर भागातील खासगी रुग्णालयात बेड उपलब्ध करून देण्यात आला. मात्र, दुपारपर्यंत त्यांना तपासण्यासाठी डॉक्टरही उपलब्ध होऊ शकले नाहीत. याउलट, त्यांना दिवसाचं बिल मात्र तत्काळ हाती देण्यात आलं. एकीकडे सर्व रुग्णालयांना मोफत उपचार करण्याचे सांगण्यात आले असले आणि दरांबाबत नियमावली तयार केली असतानाही शहरातील रुग्णालयांकडून आजही लूट सुरू असल्याचे या निमित्ताने पुन्हा दिसून आले आहे.

दुसरीकडे कोपरीतील भाजपच्या नगरसेवकालाही कोरोनाची लागण झाली असून त्याला देखील ठाण्यातील एकाही रुग्णालयात बेड उपलब्ध न झाल्याने त्याने मुलुंडकडे धाव घेतली होती. परंतु तेथेही त्याला बेड मिळाला नाही. अखेर मुंबईतील एका नामांकित खासगी रुग्णालयात त्याला बेड मिळाला आहे. परंतु तो देखील शेअरिंग मिळाला आहे. याचाच अर्थ रुग्णांची संख्या वाढत असतांना, त्यांच्यासाठी आता रुग्णालयात बेडही उपलब्ध होणे मुश्किल झाल्याचे दिसत आहे. महापालिकेकडून विविध ठिकाणी आता पाहणी केली जात आहे, विविध जागा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतु हे प्रयत्न आधीच होणे अपेक्षित होते असे देखील आता बोलले जात आहे.

.................

या दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. तर यापूर्वी अन्य एका महिला नगरसेविकेने कोरोनावर मात करून घरवापसी केली आहे.

संबंधित बातम्याः

कोरोना रूग्णांवर उपचार करता -करता कुटुंबालाच झाली लागण, संपूर्ण कुटुंबाचा आला कोरोना पॉझिटीव्ह

पिंपरीत क्वारंटाईन सेंटरवरुन राष्ट्रवादी, भाजपात चिखलफेक ; नगरसेवकांना घेतले ताब्यात

मुंबई पोलीस दलातील तेरावा बळी, आणखी एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू

ठाण्यात १२ दिवसांत ७८ कंटेनमेंट वाढले; प्रशासनासमोर आव्हान

ठाणे, उल्हासनगर रुग्णालयातील २७ वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा

Web Title: Coronavirus News in Thane: Two corporators in Thane Covid 19 Positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.