CoronaVirus News: मीरा-भाईंदरमध्ये कोरोनाच्या रुग्णांवर उपचारांत कमतरता नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 01:05 AM2020-08-10T01:05:12+5:302020-08-10T01:05:20+5:30
मीरा-भाईंदर महापालिकेने आहे त्या वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांसह कोरोनावर मात करण्यासाठी मानधनावर वैद्यकीय कर्मचाऱ्यांची भरती सुरू केली आहे.
- धीरज परब
मीरा रोड : सरकारच्या रुग्णालयासाठी असलेल्या निकषांनुसार डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी यांची संख्या तुलनेने कमी असली, तरी कोरोना रु ग्णांवर उपचार करण्यात मात्र ही कमतरता अडचण ठरलेली नाही.
मीरा-भाईंदर महापालिकेने आहे त्या वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांसह कोरोनावर मात करण्यासाठी मानधनावर वैद्यकीय कर्मचाऱ्यांची भरती सुरू केली आहे. कोरोनावर उपचार करणाऱ्या भाईंदरमधील पालिकेच्या भीमसेन जोशी रु ग्णालयात महापालिकेचे डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी मिळून १०७ जण आहेत. याशिवाय, रु ग्णालयाचे व्यवस्थापन सरकारकडे असल्याने नियुक्त केलेले डॉक्टर कार्यरत आहेत.
जोशी रु ग्णालयात कोरोना रुग्णांना उपचारासाठी दाखल केले जात असून या ठिकाणी अतिदक्षता विभाग, व्हेंटिलेटरची सुविधा पालिकेने केलेली आहे. सरकारच्या डॉक्टरांव्यतिरिक्त पालिकेने येथे एमबीबीएस झालेले चार, तर आयुषचे ४४ डॉक्टर नियुक्त केले असून ते सेवा देत आहेत. याशिवाय, परिचारिका, लॅब टेक्निशियन, क्ष-किरणतज्ज्ञ आदी नियुक्त केले आहेत.
जोशी रुग्णालयातून मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण बरे होऊन परतले आहेत. कोरोना संसर्गकाळात येथे वैद्यकीय सेवा बºयापैकी देण्यात आली आहे. काही तक्र ारी वा गैरसोयी असल्या, तरी इतक्या मोठ्या संख्येने रु ग्णांना मोफत उपचार व जेवण आदी सुविधा मिळाली, हेही दिलासादायक आहे.
महापालिकेच्या कोविड केअर-१ मध्येही ४२ वैद्यकीय कर्मचारी असून त्यात एक एमबीबीएस व सात आयुष डॉक्टर आहेत. कोविड केअर-२ मध्ये ३२ वैद्यकीय कर्मचारी व आठ आयुष डॉक्टर आहेत. तर, अलगीकरण कक्षात २५ वैद्यकीय कर्मचारी असून त्यात आठ आयुष डॉक्टरांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी महापालिकेने रुग्णालय व्यवस्थापक यांची नियुक्ती केलेली आहे. शहरातील ११ खाजगी रुग्णालयांमध्येही कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. सुरुवातीला मात्र बहुतांश रु ग्णालयांनी कोरोनावर उपचार चालवले नव्हते. कर्मचारीवर्गातही काहीसे भीतीचे वातावरण होते.
सध्या राखीव बेड राहत आहेत रिकामे
आता पहिल्यासारखी स्थिती नसून खाजगी रुग्णालयांतही कोरोनासाठी राखीव बेड रिकामे राहत आहेत. त्यातच, खाजगी रुग्णालयांत काम मागण्यासाठी येणाºया वैद्यकीय कर्मचाºयांची संख्या वाढली आहे. त्यामुळे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी यांची कमतरता नसल्याचे एका खाजगी डॉक्टरने सांगितले.