CoronaVirus News: लॉकडाऊनकाळात अत्यावश्यक सेवेसाठीच धावणार टीएमटी बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 01:12 AM2021-04-06T01:12:45+5:302021-04-06T01:12:55+5:30

प्रवाशांची संख्या कमी करण्याचा निर्णय : उभ्याने प्रवास करण्यास मनाई, १७ बस पुन्हा रुग्णांच्या सेवेत दाखल

CoronaVirus News: TMT bus will run only for essential services during lockdown | CoronaVirus News: लॉकडाऊनकाळात अत्यावश्यक सेवेसाठीच धावणार टीएमटी बस

CoronaVirus News: लॉकडाऊनकाळात अत्यावश्यक सेवेसाठीच धावणार टीएमटी बस

Next

ठाणे : राज्यात आता पुन्हा मिनी लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार ठाणे परिवहन सेवेनेदेखील परिपत्रक काढण्याचे निश्चित करून टीएमटीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या घटवण्याचा निर्णय घेतला. तसेच लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेसाठी बस रस्त्यावर उतरविल्या जाणार असून त्याचे प्रमाण ५० टक्क्यांच्या आसपास असणार आहे.

टीएमटीच्या बसना सकाळ आणि सायंकाळी प्रवाशांची गर्दी होते. परंतु,  आता मिनी लॉकडाऊनमुळे परिवहन सेवेने प्रवाशांच्या प्रवासावरदेखील बंधने आणण्यास सुरुवात केली आहे. प्रवाशांना उभ्याने प्रवास करता येणार नसल्याचे परिवहनने स्पष्ट केले आहे. यासाठी परिवहनच्या स्टेशन भागातून सुटणाऱ्या बसमध्ये जेवढ्या सीट असतील तेवढेच प्रवासी बसविले जाणार आहेत. यामुळे पुढील थांब्यावर थांबलेल्या प्रवाशांनी करायचे काय असा प्रश्न मात्र या निमित्ताने उपस्थित होणार आहे. यापूर्वीही परिवहन प्रशासनाने अशा प्रकारची बंधने घालण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, प्रवाशांकडून त्याचे पालन होतांना दिसत नसल्याचे परिवहनचे म्हणणे आहे. त्यामुळे आतातरी याचे पालन होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लॉकडाऊनच्या कालावधीत टीएमटीची सेवा केवळ अत्यावश्यक सेवेसाठी रस्त्यावर उतरविली जाणार आहे. तसेच १७ बस या ॲम्ब्युलन्स म्हणून पालिकेला पुन्हा दिल्याचेही परिवहनकडून सांगण्यात आले.

Web Title: CoronaVirus News: TMT bus will run only for essential services during lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.