coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत गुरुवारी १५८६ ने वाढ, ुदिवसभरात २९ मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 02:06 AM2020-09-04T02:06:14+5:302020-09-04T02:07:05+5:30
ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोनाचे ३२९ नवे रुग्ण आढळले. शहरात २६ हजार ७३५ रुग्णांची नोंद आतापर्यंत करण्यात आली आहे, तर आतापर्यंत ८५१ मृत्यूंची नोंद झाली आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात ४०५ रुग्णांची वाढ झाली, तर आठ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.
ठाणे : जिल्ह्यात गुरुवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत एक हजार ५८६ ने भर पडली. यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या एक लाख २८ हजार २९ झाली आहे. तर, २९ जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या आता तीन हजार ६४३ झाली आहे. विशेष म्हणजे ठाणे शहरात गुुरुवारी एकही रुग्ण दगावला नसल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोनाचे ३२९ नवे रुग्ण आढळले. शहरात २६ हजार ७३५ रुग्णांची नोंद आतापर्यंत करण्यात आली आहे, तर आतापर्यंत ८५१ मृत्यूंची नोंद झाली आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात ४०५ रुग्णांची वाढ झाली, तर आठ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.
भिवंडी महापालिका क्षेत्रात १६ बाधित आढळले, तर एका मृत्यूची नोंद करण्यात आली. आता बाधितांची संख्या पाच हजार २६८ झाली आहे. मीरा-भार्इंदरमध्ये १८५ रुग्णांची, तर पाच जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अंबरनाथमध्ये ३१ रुग्णांची वाढ झाली असून एका जणाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बदलापूरमध्ये ८८ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या चार हजार ३३१ झाली. या शहरात एकही मृत्यू झालेला नाही. त्यामुळे मृतांची संख्या ७३ कायम आहे.
नवी मुंबईत ३३५ रुग्ण वाढले
नवी मुंबई महापालिकेत ३३५ रुग्णांची, तर सात जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत बाधितांची संख्या २१ हजार ११२ झाली असून मृतांचा आकडा ६११ वर गेला आहे.
वसई-विरारमध्ये
२४० नवीन रुग्ण
वसई-विरार शहरात गुरुवारी दिवसभरात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच दिवसभरात २४० नवे रुग्ण आढळून आले असून १०६ रुग्णांनी कोरोनावर मात केली. महापालिका हद्दीत आता एकूण रुग्णसंख्या १७ हजार ३०९ वर पोहोचली आहे.
रायगडमध्ये ६१५
नव्या रुग्णांची नोंद
अलिबाग : रायगड जिल्ह्यात गुरुवार, ३ सप्टेंबर रोजी ६१५ नव्या कोरोना पॉझिटिव्ह
रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे बाधित रु ग्णांची
संख्या २८ हजार ४६१ वर पोहोचली आहे.